हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HDFC : देशातील सर्वात मोठी हाउसिंग फायनान्स कंपनी असलेल्या हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड फायनान्स कॉर्पोरेशन कडून आपल्या होम लोनवरील व्याजदरात वाढ केली गेली आहे. यामुळे आता ग्राहकांना चांगलाच धक्का बसला आहे. HDFC ने शनिवारी आपल्या रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) मध्ये वाढ केली. RPLR हा बेंचमार्क लोन रेट असतो ज्याला किमान व्याजदर असे देखील म्हणता येईल. HDFC ने आता त्यामध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे.
HDFC कडून शनिवारी शेअर बाजाराला ता व्याजदरवाढीची माहिती देण्यात आली. आता 1 ऑगस्टपासून हे नवीन दर लागू करण्यात येतील. या दर वाढीचा फटका ग्राहकांना बसणार आहे. कारण यानंतर लोन वरील EMI मध्ये देखील वाढ होईल. ज्यामुळे ग्राहकांच्या महिन्याचे आर्थिक गणित बिघडेल. एचडीएफसीने सांगितले की, “एचडीएफसीने घरांच्या कर्जावरील रिटेल मुख्य कर्जदरात वाढ केली आहे. हा असा दर आहे ज्यावर एडजस्टेबल रेट होम लोन्स (ARHL) बेंचमार्क केले जातात. यामध्ये 25 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.25 टक्क्यांनी दर वाढ करण्यात आली आहे. 1 ऑगस्ट 2022 पासून हे नवीन दर लागू होतील.”
गेल्या 3 महिन्यांत HDFC होमलोन 5 पट महागले
एचडीएफसी कडून RPLR मध्येयाआधीच 9 जून रोजी 50 बेस पॉइंट्स किंवा 0.50 टक्के तर 1 जून रोजी 0.5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. याच्याही आधी होम लोनवरील व्याजदरात 2 मे रोजी 5 बेसिस पॉइंट्सने तर 9 मे रोजी 0.30 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. एचडीएफसी RPLR मध्ये वाढ झाल्यामुळे आता कर्जदारांसाठी होम लोन आणखी महागतील आणि त्यांना EMI साठी जास्त रक्कम द्यावी लागेल.
RBI कडून व्याजदर आणखी वाढवले जाऊ शकतील
RBI च्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीच्या काही दिवसांपूर्वीच एचडीएफसीने व्याजदरात ही वाढ केली आहे. RBI च्या या MPC बैठकीत महागाई रोखण्यासाठी रेपो दरात वाढ करणे अपेक्षित आहे. ही बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. एका सूत्रांकडून मिळालेल्या बातमीनुसार, पुढील बैठकीत रेपो दर 0.35 वरून 0.50% पर्यंत वाढवला जाऊ शकेल.
इथे हे लक्षात घ्या कि, चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चलनविषयक धोरण समिती कडून मे आणि जूनमध्ये सलग दोन टप्प्यांत रेपो दरात 0.90% वाढ करण्यात आली होती. त्यामुळे हा रेपो दर 4.90% वर गेला. यानंतर बँका आणि इतर कर्ज देणाऱ्या संस्थाकडून सातत्याने कर्ज महागले जात आहेत. मात्र, एकीकडे कर्जावरील व्याज दरात वाढ होत असतानाच बँकाकडून एफडीवरील व्याजदरही वाढवले जात आहेत.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfc.com/housing-loans/home-loan-interest-rates
हे पण वाचा :
‘या’ बँकांकडून दिले जात आहे सर्वात स्वस्त Car Loan, व्याज दर तपासा
Changes from 1 August : ऑगस्ट महिन्यात होणार ‘हे’ 5 महत्त्वाचे आर्थिक बदल !!!
ITR भरण्याची मुदत वाढणार का?? आयकर विभागाने स्पष्ट केली भूमिका
ATM कार्डवर फ्री मध्ये मिळतो 5 लाखांपर्यंतचा विमा; असा करा क्लेम
Multibagger Stock : एका वर्षात ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिला मोठा नफा !!!