औरंगाबाद – मशिदीच्या व्यवस्थापकीय समितीच्या फेरबदलाबाबत वक्फ बोर्डात सुनावणीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यास मदत करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच घेताना खाजगी व्यक्तीला काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
मशीद ट्रस्टचा सभासद व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली होती. या सुनावणीत निकाल व बोर्डा मधून तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यात मदत करण्यासाठी 60 हजार रुपयांची मागणी केली होती तडजोडी अंती 50 हजार रुपयांची लाच देण्यास तक्रारदार आणि लाच मागणारा शेख फैसल मोहंमद इक्बाल (43) तयार झाले. लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदाराने एसीबी कडे अर्ज केला. एसीबीचे पोलिस निरीक्षक हनुमंत वारे यांच्या पथकाने सापळा लावला. त्यात शेख फैसल याला 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अतिरिक्त अधीक्षक विशाल खांबे, उपाधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनात पीआय वारे, अंमलदार साईनाथ तोडकर, मिलिंद इप्पर, केवलसिंग गुसिंगे यांच्या पथकाने केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.