मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील (Mumbai) मालाड परिसरात बेस्ट बसमध्ये चढू दिलं नाही म्हणून एका तरुणाने भर रस्त्यात बस थांबवून बसची काच फोडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. मुंबईतील (Mumbai) मालाड परिसरात आज सकाळी ही घटना घडली आहे.
काय घडले नेमके ?
बसमार्ग क्रमांक 345 ची बेस्ट बस मीठचौकी सिग्नलवर सकाळी 9.45 वाजता उभी होती. त्यावेळी एक तरुण बेस्ट बस पूर्णपणे भरलेली असताना आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. पण बसमध्ये जागा नसल्यामुळे कंडक्टरने त्याला मागील बसमध्ये चढण्यास सांगितले. पण त्याने बसमध्ये चढण्याचा हट्ट केला. यानंतर संतापलेल्या या तरुणाने बसच्या समोर जाऊन दगडाने बसची तोडफोड केली.
बेस्ट बसमध्ये चढू दिले नाही म्हणून तरुणाने गाडी थांबवून फोडली काच pic.twitter.com/QUjPeCA2No
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 9, 2022
हा सगळा प्रकार बसमधील कंडक्टरने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यावेळी रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनीही त्याची समजूत काढली. पण, हा तरुणा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी त्या ठिकाणी असलेल्या वाहतूक पोलिसाने त्याला ताब्यात घेतलं आणि बांगरनगर पोलीस स्टेशनला नेऊन सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
हे पण वाचा :
आता सहकारी बँकांकडून घेता येणार 1.40 कोटी रुपयांपर्यंतचे होम लोन, RBI ने वाढवली मर्यादा
चालत्या ट्रेनमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला अटक
आता ICICI Bank च्या फिक्स डिपॉझिटवर मिळणार जास्त व्याज !!!
IND vs SA T-20 : टीम इंडियाला दुसरा धक्का, केएल राहुल नंतर ‘हा’ खेळाडू टीममधून बाहेर
खुशखबर !!! Credit Card युझर्सना आता UPI द्वारेही करता येणार पेमेंट