बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात चिखलामुळे एका ट्रॅक्टर चालकाला आपला जीव गमवावा (accident) लागला आहे. चिखलात रुतलेला ट्रॅक्टर काढताना, हेड आणि ट्रॉलीच्यामध्ये उभा असलेल्या चालकाचा अचानक हेड उचकल्याने चेंगरून मृत्यू (accident) झाला आहे. ही घटना बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा या ठिकाणी घडली आहे. गंगाधर बळीराम तोडकर असे या मृत ट्रॅक्टर चालकाचे (accident) नाव आहे.
काय घडले नेमके ?
मृत गंगाधर तोडकर हे दुसऱ्याच्या शेतात ट्रॅक्टरमध्ये माती भरून टाकण्यासाठी घेऊन जात (accident) होते. या दरम्यान दोन दिवसांपासून परिसरात रिमझिम पाऊस असल्याने चिखल झाला होता. यादरम्यान एका ठिकाणी चिखलात ट्रॅक्टरचे चाक फसल्याने ते हेड आणि ट्रॉलीच्यामध्ये उभे राहिले होते. यावेळी अन्य एका चालकाने त्यांना तिथे उभे न राहण्यास सांगितले.
मात्र आपले चिखलात पाय भरतील म्हणून ते त्याच ठिकाणी उभे राहिले. यावेळी अचानक हेड समोरच्या बाजूने उचलले गेल्याने हेड आणि ट्रॉलीच्यामध्ये चेंगरून गंगाधर यांचा मृत्यू (accident) झाला. गंगाधर यांच्या अशा अपघाती मृत्यूमुळे ममदापूर पाटोदा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर