हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळ्यात सर्वात जास्त खाल्ले जाणारे फळ म्हणजे पेरू (Guava). हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत मसाला, मीठ आणि पेरू याचे मिश्रण करून खाणे हे सर्वांनाच आवडते. तसेच प्रवासात याची जोड मिळाली तर आहाहाहाहा… असे उद्गार तोंडून निघतात. पण तुम्हला माहितीये का पेरू खाल्याने आरोग्याला काय फायदे होतात ते. नसेल माहिती तर घाबरू नका आम्ही तुम्हाला सांगू.
काय आहेत पेरू खाण्याचे फायदे? Benefits Of Eating Guava
पेरू हे असे फळ आहे जे आपल्या आरोग्यासाठी अत्यन्त फायदेशीर आहे. ज्यातून आपल्याला अनेक पोषक तत्व भेटतात. पेरू खाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण हे नियंत्रणात राहते. पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही आणि नियंत्रणात राहते. त्यामुळे पेरू खाण्याचा हा सर्वात मोठा फायदा आहे.
मासिक पाळीत पडते उपयोगी
मासिक पाळीत महिलांना होणाऱ्या असह्य वेदनावरती पर्याय म्हणून पेरूकडे पाहिले जाते. पेरू खाल्याने होणाऱ्या वेदनांची पातळी कमी होते. त्यामुळे या काळात पेरू आहारात जास्त खावा.
वजन कमी करण्यास ठरते फायदेशीर
अनेकजण आपल्या वजनाला घेऊन खूप काळजीत असतात. अश्या व्यक्तीने पेरू खाल्यास त्याचे वजन नियंत्रणात येऊ शकते. कारण पेरूमध्ये फायबर आणि मिनरल्स आणि फक्त 30 ते 60 कॅलरीज असतात. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पेरू हा उत्तम पर्याय आहे. तसेच ज्या व्यक्तींना अधिक भूक लागते त्यांनी पेरू खाल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.
बद्धकोष्ठतेवरील उपाय म्हणजे पेरू
पेरू खाल्याने तुमचा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो. तुम्ही जर जास्त पेरू खाल्ले तर तुमचे आतडे चांगले राहतात आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
हृदयाला ठरते फायदेशीर
पेरू खाल्याने तुमचे हृदय चांगले राहू शकते. कारण पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम, आणि फायबर समाविष्ट असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. आणि परिणामी ह्रदयाचे आरोग्य चांगले राहून निर्माण होणारा स्ट्रोकचा धोका कमी होतो. त्यामुळे पेरू खाणे हे अत्यंत फायदेशीर आहे.
चुकूनही पिऊ नका पेरूचे पेय
अनेकदा फळ खाताना आपण विचार करतो की याचे पेय करून प्यावे. परंतु पेरूचे पेय चुकूनही पिऊ नका. कारण पेरूमध्ये साखरेचे प्रमाणा खूप जास्त असल्यामुळे ते तुमच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते.