हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएन्ट चा देशात शिरकाव झाला असून आत्तापर्यंत कर्नाटक, गुजरात, दिल्ली आणि महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला गंभीर इशारा दिला आहे. ओमिक्रोनला रोखले नाही तर मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ शकतो असे राजेश टोपे यांनी म्हंटल आहे.
राजेश टोपे म्हणाले, डेल्टाला रिप्लेस करण्याचे काम ओमीक्रोन ने केले आहे. डेल्टा व्हेरिएंटवर आपण मात केली, डेल्टाचे राज्यात रुग्ण कमी झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. परंतु ओमिक्रोनला रोखले नाही तर मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ शकतो असा इशारा राजेश टोपे यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, ओमिक्रोनला रोखण्यासाठी साठी जे जे करता येईल ते करावे लागणार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर लॉकडाऊन लागला आणि कित्येक दिवस घरात बसून काढावे लागले, तशी वेळ पुन्हा येऊ द्यायची नसेल तर नियमांंचं पालन होणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. ज्यांनी कोविड लस घेतली नाही, त्यांनी पहिली लस घ्यावी. पहिली घेतली असेल तर दुसरी मात्रा द्यावी, असे आवाहन टोपे यांनी केले होते.