हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला भीषण आग लागली. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सएसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे
महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू आहे. विरार कोविड हॉस्पिटलमधे 13 मृत्यू. कधी ऑक्सिजन तर कधी आग. ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेची मुद्दा न बनवता केंद्र सरकारची तसेच लष्कराची मदत घ्यावी. महाराष्ट्रातील सर्व कोविड केंद्रामधील ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तातडीने करण्यात यावं. यासाठी या श्रेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. तसेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.
महाराष्ट्रात कोविड मृत्यूचे तांडव सुरू आहे
विरार कोविड हॉस्पिटलमधे 13 मृत्यू. कधी ऑक्सिजन तर कधी आग. ठाकरे सरकारनी कोविड रुग्णां साठी भारत सरकार आणि सैन्याची मदत घ्यावी
तज्ञांद्वारे कोवीड केंद्रांचे ऑक्सिजन आणि आग सुरक्षेचे ऑडिट करावे
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मुक्त करावे pic.twitter.com/C9ZoWanUqJ
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 23, 2021
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
दरम्यान, वसईतील वल्लभ कोव्हिड रुग्णालयातील ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नव्हते, असेही बोललं जात आहे. मात्र अद्याप याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवावा झाल्या आहेत. तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.