हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सव सणामध्ये कोरोनात वाढ होऊ नये यासाठी राज्य सरकारकडून लसीकरणं वाढविण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान केंद्राकडूनही कोरोनात काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. याता गणेशोत्सव जवळ आल्याने कोकणवासियांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. या पार्शवभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आज महत्वाचे विधान केले आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना लॉकडाऊनच्या निर्बंधातून सूट देण्यात आलेली नसल्याचे टोपेंनी म्हंटले आहे.
राज्यात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनतेकडून तयारी केली जात आहे. बाजारपेठांमध्ये आकर्षक फुलांचा माळा व सजावटीचे साहित्यही दाखल होऊ लागे आहे. या दरम्यान व्यापाऱ्यांशी जनतेला एकच चिंता लागून राहिली आहे ती म्हणजे यंदा तरी लाडक्या बाप्पांचे उत्साहात स्वागत केले जाईल का? अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून रात्रीच्यावेळी संचारबंदीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता सुरुवातीला डॉ. टोपेंनी वर्तवली होती. मात्र, आता त्यांनी याबात अद्याप कुठलाही निर्णय झाला नसून टास्क फोर्ससोबत चर्चा करून यावर मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, असे टोपेंनी म्हंटले आहे.
कोकणातील गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत डॉ. टोपे म्हणाले की, गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आरटीपीसीआर चाचणी तसेच लसीकरणाची अट बंधनकारक असणार आहे. चाकरमान्यांना निर्बंधात कोणत्याही प्रकारची सूट देण्यात आलेली नाही. शासनाच्या आदेशाचे कोकणवासियांनी पालन करणे आवश्यक आहे. चाकरमान्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस अनिवार्य करण्यात आल्याचेही यावेळी डॉ. टोपे यांनी सांगितले.