हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Healthy Food) मोजून काही दिवसांवर ‘व्हेलेंटाईन डे‘ येऊन ठेपला आहे. या दिवसाचं तरुणांना विशेष आकर्षण असतं तर प्रेमी युगलांसाठी हा दिवस एखाद्या सणासारखा असतो. दरम्यान व्हेलेंटाईन वीकमध्ये सगळं प्रेमात असल्याची जाणीव होऊ लागते. सगळं काही गुलाबी वाटू लागतं. जो आपल्या प्रिय व्यक्तीला खुश करण्यासाठी कधी चॉकलेट तर कधी गिफ्ट्स देताना दिसतो. एकंदरच हा महिना आकर्षण निर्मितीचा आणि प्रेमाची कबुली देण्याचा असतो.
इतक्या गुलाबी वातावरणातसुद्धा काही कपल्स मात्र दुरावताना दिसतात. कुणी भांडताना तर कुणी चिडचिड करताना दिसतात. काही नाती किरकोळ वादामुळे तुटताना दिसतात. प्रेमाच्या दुनियेत कधी काळी एकमेकांवर नितांत प्रेम करणारे हे जीव वेगळे का होतात? याचा कधी विचार केला आहे का? विज्ञान सांगत कि, एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटण्यामागे हार्मोन्स जबाबदार असतात. आता याला तुम्ही भावना म्हणा किंवा प्रेमलहरी. मानवी शरीरातील ऑक्सिटोसिन या हार्मोन लव्ह हार्मोन्स किंवा प्रेम संप्रेरक असे म्हणू शकतो. (Healthy Food)
वास्तविक या लव्ह हार्मोनमुळे माणसात प्रेमाभावनेची उत्पत्ती होते. आपल्या शरीरातील हे लव्ह हार्मोन आपल्या मनात एखाद्या विषयी सकारात्मकपणे प्रेम, आसक्ती किंवा ओढ निर्माण करण्यास जबाबदार असतात. मात्र. आपल्या शरीरात लव्ह हार्मोनची कमतरता असेल तर मात्र नकारात्मकता, नैराश्य आणि चिंता वाटणे असे त्रास सुरु होतात. (Healthy Food) यामुळे जोडीदाराबाबत वाटणारे प्रेम आणि ओढ हळू हळू कमी होते. परिणामी राग, रुसवा, भांडणांचे प्रमाण वाढते आणि याच परिणाम नात्यावर होतो. असे आपल्या बाबतीत होऊ नये म्हणूनच लव्ह हार्मोनची पातळी राखणे आवश्यक आहे. ज्यासाठी आम्ही तुम्हाला काही पदार्थांची माहिती देणार आहोत. ज्यांचा तुमच्या आहारात समावेश असल्यास लव्ह हार्मोन्स तयार होण्यासाठी मदत होते. जाणून घ्या.
लव्ह हार्मोन्स वाढवणारे अन्न पदार्थ (Healthy Food)
केळी – सर्वसाधारण वाटणाऱ्या केळ्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. शिवाय अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट्स, मॅग्नेशियम, मँगनीज, पोटॅशियम, तांबे, रिबोफ्लेविनने समृद्ध असणारे केळे आपल्या आरोग्यासाठी अनेकप्रकारे फायदेशीर आहे. यातील मुख्य फायदा म्हणजे शरीरात लव्ह हार्मोन्सची पातळी संतुलित करण्यासाठी केळी फायदेशीर ठरतात. त्यामुळे आपल्या आहारात केळ्याचा समावेश जरूर करा.
टरबूज – टरबुजाचे फळ हे शरीरातील पाण्याची मात्रा वाढवते. या फळातील अँटीऑक्सीडेंट आपल्या शरीरातील हॅप्पी हार्मोन्स तसेच लव्ह हार्मोन्सची निर्मिती प्रक्रिया जलद करतात आणि त्यांची पातळी वाढवतात. यामुले लव्ह हार्मोन्सचे प्रमाण वाढते आणि आपला मूड चांगला राहतो. (Healthy Food)
ब्लूबेरी – ब्लूबेरीमध्ये विविध प्रकारची जीवनसत्त्वे, फायटोकेमिकल्स आणि अँटी ऑक्सिडंट असतात. जे शरीरातील हानिकारक प्रभाव कमी करतात आणि तुमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात. त्यामुळे मन शांत आणि तणाव कमी होतो. परिणामी लव्ह हार्मोन्सची पातळी वाढते आणि मनात प्रेमभावना जागृत होते.
ॲव्होकॅडो – एका वृत्तानुसार, ॲव्होकॅडो हे एक असे फळ आहे ज्याच्या सेवनाने मानवी शरीरात लव्ह हार्मोन तयार होऊ शकतात. कारण या फळामध्ये विविध अँटिऑक्सिडेंटचा समावेश असतो. (Healthy Food) जे ऑक्सीटोसिन या लव्ह हार्मोनची पातळी वाढवण्यास सहाय्यक ठरतात. तसेच हे फळ खाल्ल्याने तणाव कमी होतो आणि आनंदी वाटू लागते.
ड्रायफ्रूट्स – ड्रायफ्रुट्सचे सेवन आपल्या शरीरासाठी विविध प्रकारे फायदेशीर आहे. यातील मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मँगनीजसारखे घटक शरीराला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात आणि मन एकाग्र करतात. परिणामी मेंदूवरील ताण कमी होतो आणि आराम मिळतो. यामुळे लव्ह हार्मोन्सची पातळी संतुलित राहते आणि आपला मूड रिफ्रेश राहते. वाईट विचार येत नाहीत.
सब्जाच्या बिया – सब्जाच्या बिया पाण्यात भिजवून नियमित हे पाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता बाहेर पडते आणि आराम मिळतो. तसेच सब्जामध्ये आढळणारे मल्टी विटामिन्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस यांसारखे पोषक घटक शरीरात लव्ह हार्मोन्स तयार करण्यास आणि त्यांची पातळी वाढवण्यास सहकार्य करतात. (Healthy Food)
डार्क चॉकलेट – डार्क चॉकलेट खाल्ल्याने आपल्या मनाला शांतता मिळते. तसेच आपला मूडला सुधारण्यासाठी फायदा होतो. यामध्ये आढळणारे फ्लेव्होनॉइड्स आणि कोको अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करतात आणि आपल्या शरीरात लव्ह हार्मोन्सच्या निर्मितीसाठी सहकार्य करतात.
सॅल्मन फिश – सॅल्मन फिश म्हणजेच रावस मासा. या माश्यात अमीनो ऍसिड आणि टेमोलिटिक्सच्या स्वरूपात ओमेगा – ३ सारख्या फॅटी ऍसिड तसेच व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी आढळते. (Healthy Food) शिवाय कोलीन, पॅन्टोथेनिक ऍसिड, बायोटिन, सेलेनियम, जस्त, फॉस्फरस, लोह आणि कॅल्शियम सारख्या खनिजांची हा मासा समृद्ध आहे. त्यामुळे सॅल्मन फिश हा लव्ह हार्मोन्स निर्मितीसाठी अत्यंत लाभदायी ठरतो.