नवी दिल्ली । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) कोरोना लशीच्या डिलीव्हरीचा रिअल टाईम मॉनिटरिंगसाठी एक मोबाईल अॅप्लिकेशन (CO-WIN APP) तयार केलं आहे. त्याशिवाय एक डिजीटल प्लॅटफॉर्मही विकसित करण्यात आलं आहे. यामाध्यमातून डेटा रेकॉर्ड (Data Record) ठेवला जाऊ शकतो. तसेच, लोक स्वत: कोरोना लशीसाठी नोंदणी करु शकतील. आरोग्य सचिव (Health Secretary) राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. को-व्हिन डिजीटल प्लॅटफॉर्मवर पूर्ण लसीकरण प्रक्रियेवर लक्ष ठेवलं जाऊ शकतं.
को-व्हिन डिजीटल प्लॅटफॉर्म ५ मॉडेल
को-व्हिन (CO-WIN APP) डिजीटल प्लॅटफॉर्मवर मोबाईल अॅप्लिकेशनला मोफत डाऊनलोड करता येतं. यामुळे लशीचा डेटा रेकॉर्ड ठेवण्यात मदत मिळेल. लशीसाठी कुठलाही व्यक्ती यावर सहज नोंदणी करु शकते. को-व्हिन अॅपमध्ये-अॅडमिनिस्ट्रेटर मॉड्यूल, रजिस्ट्रेशन मॉड्यूल, लस मॉड्यूल, बेनिफीशिअरी अॅकनॉलेजमेंट मॉड्यूल आणि रिपोर्ट असेल. अॅडमिनिस्ट्रेटर मॉड्यूल त्या अॅडमिनिस्ट्रेटर्ससाठी आहे, जे या लसीकरणाच्या सेशन्सचं संचालन करेल. या मॉडेलच्या माध्यमातून ते सेशन्स बनवू शकतात, अशी माहिती राजेश भूषण यांनी दिली.
लसीसाठी नोंदणी करण्यास होणार मदत
रजिस्ट्रेशन मॉड्यूल हे लोकांना लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी आहे. हे स्थानिक अधिकारी किंवा सर्वेक्षणकर्त्यांद्वारे प्रदान केलेल्या को-मॉर्बिडिटीवर बल्क डेटा अपलोड करेल (Mobile Application For Corona Vaccine).
लस मॉड्यूल
लसीकरण मॉड्यूल बेनिफीशिअरी डेटाला अपडेट करेल आणि लसीकरणाच्या स्थितीला अपडेट करेल. बेनिफीशिअरी अॅकनॉलेजमेंट मॉड्यूल लाभार्थ्यांना एसएमएस पाठवेल आणि एका लसीकरणानंतर क्युआर आधारित प्रमाणपत्रही देईल.
कोरोना लशीसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म
रिपोर्ट मॉड्यूलमध्ये किती लस सेक्शन आयोजित केले गेले, किती लोक यात सहभागी झाले, किती लोक बाहेर पडले याप्रकारचा अहवाल यात तयार करण्यात येईल, असंही राजेश भूषणने सांगितलं.
दाक्षिणात्य अभिनेत्री चित्राने उचलले टोकाचे पाऊल; हॉटेल रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/7B7gZZi6ap#HelloMaharashtra #chitra #tollywoodactress #sucide— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 9, 2020
फक्त 'या' कारणामुळं हॉटेल ताज पॅलेसची तब्बल 8 कोटी 85 लाखांची थकबाकी BMCने केली माफ
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/FyhrfByhDc#tajhotel #Mumbai #HelloMaharashtra #BMC— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 9, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’