दोन आठवड्यानंतर पावसाची जोरदार हजेरी,  अर्ध्या तासात 27. 4 मिलिमीटर पावसाची नोंद

औरंगाबाद : शहरात तब्बल 20 दिवसानंतर रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली सुमारे अर्धा तास हा पाऊस पडला असून, तासभराच्या पावसाने शहरातील अनेक भागातील रस्ते पाण्यात बुडाले. रविवारी शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण झाले होते. दुपारी पावसाने हजेरी लावली या दिवशी तासभराच्या पावसाने अनेक भागातील घरात पाणी शिरण्याचा प्रकार झाला होता.

सायंकाळी पाचनंतर आकाशात मोठ्या प्रमाणात ढगांची गर्दी झाल्याने सात वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. प्रारंभी हलक्या स्वरूपात बरसणाऱ्या पावसाने काहीवेळातच जोर धरला शहर आणि परिसरात पावसाने चांगलेच धुऊन काढले जवळपास अर्धा तास पावसाचा जोर कायम होता.

अर्धातास सर्वत्र मुसळधार सरी कोसळल्या सायंकाळी सहा वाजता हरसुल हिमायतबाग, हडको लेबर कॉलनी, जुबली पार्क, मिल कॉर्नर औरंगाबाद. पावसाला सुरुवात झाली नंतर सिडको, क्रांती चौक, उस्मानपुरा, बीड बायपास, गारखेडा अशा विविध भागात जोरदार पाऊस झाला.