हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज आणि उद्या देशात आणि राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. (Weather Update) मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यामुळे या दोन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज आणि उद्या महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. मुंबईत मात्र फक्त रिमझिम सरी कोसळू शकतात. त्यामुळे इतर भागात यंदाचा परतीचा पाऊस दणक्यात कोसळून शकतो.
देशातील अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी
भारतीय हवामान खात्याने, 8 ऑक्टोंबरपर्यंत देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. फक्त उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम भागात मुसळधार पाऊस पडणार नाही. परंतु इतर आजूबाजूच्या परिसरात पावसाच्या सरी हजेरी लावू शकतात. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामधील देखील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे पुढील 24 तासात राज्यातील अनेक भागात परतीचा पाऊस धुमाकूळ घालेल.
महाराष्ट्रातील वातावरण (Maharashtra Rain)
महाराष्ट्रविषयी बोलायला गेलो तर सध्या महाराष्ट्रात देखील मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य मोसमी वारे माघारी फिरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील काही ठराविक ठिकाणीच मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. तर, दुसरीकडे विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबई आणि उपनगरात अंशतः ढगाळ वातावरण राहू शकते. या भागात मुसळधार पावसाऐवजी स्वरूपाच्या सरी बरसतील.