हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिमाचल प्रदेशात पावसाने थैमान घालून ठेवले आहे. गेल्या ४८ तासांपासून पाऊस आपले रौद्ररुप धारण करुन मुसळधार कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने हिमाचल प्रदेशातील १० जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. या मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सध्या हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलामध्ये देखील काही वेगळे चित्र दिसत नाही. शिमलामध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये भूसखलनाच्या घटना घडल्या आहेत. या घटनांचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. यातून तेथील सद्यस्थितीची दाहकता दिसून येत आहे.
नुकताच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये मंडी जिल्ह्यातील ओनैर गावातील थुनाग बाजारातील रस्तांवर पाणीच पाणी झालेले दिसत आहे. तसेच काही घरे दुकाने वाहून गेल्याची दृश्य देखील दिसत आहेत. या पावसामुळे दुकानांचे आणि घरांचे देखील नुकसान झाले आहे. याठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित काढण्याचे काम बचाव पथक करत आहे.
More Scary visuals from Thunag area of Mandi, Himachal#Thunag #Mandi #HimachalPradesh #Manali #Kullu pic.twitter.com/qtyyo3OHcD
— Anil Thakur (@Ani_iTV) July 9, 2023
दरम्यान हिमाचल प्रदेशमध्ये सुरु असलेला पाऊस थांबायचे नाव घेत नाहीये. त्यामुळे तेथील भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व स्थितीचा आढावा घेत, नागरिकांनी पुढच्या २४ तासात सुरक्षा स्थळी राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी केले आहे.