मुंबई । राज्य सरकारने जड वाहनांवर टोल वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने जड वाहनांवर १०% टोल वाढ करण्याचा निर्णय घेतला.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील १५ टोल नाक्यावर ही वाढ लागू होणार आहे. तसेच हलक्या वाहनांवरील सूट कायमच राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खासगीकरण प्रकल्पांवर केवळ जड वाहनांसाठी पथकर दरामध्ये काही प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच कार, जीप, एसटी, स्कूल बसेस आणि हलकी वाहने यांची सूट कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सध्या राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १५ प्रकल्पांतर्गत वाहनांना पथकरातून सूट मिळणार आहे. ही सूट दिल्यामुळे या पथकर उद्योजकांना शासनास ३५० ते ४०० कोटी नुकसान भरपाई दरवर्षी द्यावी लागते. ही नुकसान भरपाई रोखीने न देता जड वाहनांवरील पथकर काही प्रमाणात वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, टोल वाढवल्याने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या जड वाहनांनावर आर्थिक बोजा वाढणार आहे. वाहतूक खर्चात वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर पडणार असल्याचं बोललं जात आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in