”भगवा फडकवायचाच असेल न तर बेळगाव, काश्मीरध्ये फडकवा पण…”, संजय राऊतांचा भाजपवर प्रहार

मुंबई । मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या कार्यकारिणी बैठकीनंतर केला होता. त्यावर “तुम्हाला भगवा फडकवायचा असेल तर बेळगावमध्ये फडकवा, पाकव्याप्त काश्मीरमध्ये फडकवा” असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला लगावला. “आमचा भगवा शुद्ध आहे. महाराष्ट्रातील जनतेला आमच्या भगव्याची माहिती आहे. कोणीही आमच्या भगव्याविषयी बोलू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा आहे. हात लावाल, तर राख व्हाल” असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला.

“भगवा फडकवायचा असेल तर बेळगावमध्ये फडकवा. भगवा फडकवायचा असेल तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये फडकवा. आमचं हिंदुत्वसुद्धा आहे. कोणी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. वेळ आल्यास आम्ही आमची हिंदुत्वाची भूमिका मांडू. मेहबूबा मुफ्तींसोबत सरकार स्थापन करणाऱ्या लोकांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये” असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
आगामी निवडणुकीत भाजपचाच विजय होईल. 2022 साली मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार आहे. राजाचा जीव जसा पोपटात अडकलेला असतो, तसा काहींचा जीव महापालिकेत अडकलेला असल्याचा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचं नाव न घेता लगावला होता. आगामी निवडणुकीत भाजपचाच विजय होईल. भाजपचा महापालिकेवर झेंडा फडकेल. मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आम्ही ही भ्रष्टाचारी सत्ता उलथवून लावणार, असा निर्धारही देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवला होता. (Sanjay Raut slams Devendra Fadnavis over his roar about BMC election)

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

You might also like