आयपीएल पेक्षा जास्त पैसा इथे लागला आहे.. हेमांगी कवीने ‘तो’ फोटो शेअर करत व्यक्त केला संताप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सरकारकडून नागरिकांना मास्क लावण्याचं आणि सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पण तरीसुद्धा लोक याकडे गांभीर्याने बघत नाही आहेत. यासाठी सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी १५ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. पण तरीसुद्धा काही लोक बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत. अशा काही लोकांवर मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हिने संताप व्यक्त केला आहे.हेमांगी कवी हिने आपला संताप एका फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केला आहे. सरकारने विनाकारण घराबाहेर पडू नका असे सांगितले असताना देखील घराच्या आवारात मिळून क्रिकेट खेळणाऱ्या काही लोकांवर हेमांगीने संताप व्यक्त केला आहे. तिने फेसबुक वर एक फोटो शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे.

काय लिहिले आहे फेसबुक पोस्टमध्ये
‘१) IPL पेक्षा ही जास्त पैसा इथे लागलेला आहे.
२) रस्त्यावर यायच्या आधी १४ दिवस यांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं.
३) दर ७२ तासांनी या सर्व खेळाडूंची RTPCR चाचणी करण्यात येते.
४) दर १ तासाने बॅट आणि बॉल सॅनिटाइझ करण्यात येत आहेत.
५) मास्क न लावता खेळण्याची परवानगी काढण्यात आलेली आहे. ( मास्क घालून कसं खेळणार, runs कमी नाही का होणार, वेडीच आहे मी)
६) ब्रेक टाइममध्ये शक्तिवर्धक काढा पेय म्हणून देण्यात येत आहे !
७) खेळून झाल्यावर या सर्व खेळाडूंना सोशल बबलमध्ये ठेवण्याची व्यवस्था केली आहे.
८) पाठीमागे दर २ तासांनी रुग्णवाहिकेच्या आवाजाने खेळाची रंजकता अजूनच वाढतेय !
तर, कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की लॉकडाउन अजून १५ दिवस काय १५ वर्ष लागला तरी काही हरकत नाही ! त. टी.: खेळा क्रिकेट … काढा कोरोनाची विकेट ! – एक जबाबदार (जळखाऊ) नागरिक!

https://www.facebook.com/hemangii.kavidhumal/posts/4430033540349574

हेमांगीने अशा प्रकारची फेसबुक पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे. तिच्या या पोस्टचे नेटकऱ्यांकरून कौतुक केले जात आहे. हेमांगीने अनेक नाटक आणि मालिकामधून चांगलेच नाव कमावले आहे. तिने आपल्या उत्तम अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडली आहे. हेमांगी कवी हि उत्तम अभिनेत्रीसोबतच एक उत्कृष्ट नृत्यांगनासुद्धा आहे.

Leave a Comment