महात्मा गांधी स्वातंत्र्य संग्रामातील नायक : संजय राऊत

sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | चीन लडाखमध्ये घुसला आहे. काश्मीरात पंडिताची हत्या होत आहेत अशा वेळी देश दुसरा गाल पुढे करत आहे हे दिसत आहे. हे मॅडमला माहित पाहिजे. महात्मा गांधी स्वातंत्र्य संग्रामातील विश्वातील नायक होते, असल्याचे गाैरवोद्गार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काढले.

संजय राऊत म्हणाले, भाजप पक्षात निराशा वाढल्याने भाजपाकडून वेगवेगळी वक्तव्ये केली जातात. हिदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. संपूर्ण देश आज त्यांना अभिवादन करत आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर अनेक गोष्टींना ब्रेक लागला असता. त्यांनी राष्ट्रभक्तीचे तेज दिले. हिदू मार खाणार नाही हे बळ आणि हिंदू पळपुटा नाही हे बाळासाहेब ठाकरे यांनी कानमंत्र दिला. त्यामुळे आजही मराठी माणसांच्यात चेतना आहे.

कंगणा राैनात संदर्भात बोलताना ते म्हणाले, काही लोक आज का बरळतात ते कोणत्या नशेत असतात त्या संदर्भात एनसीबीनं तपास करावा. तर दोन वर्षापूर्वी काय तरी द्या, याचं राज्य जावून कायद्याचं राज्य आले आहे. तुम्ही काय होता, काय झालात. पुण्यातील येरवडा दाखल व्हायची वेळ येईल.