Hero Splendor नव्या अवतारात लाँच; 60+ मायलेज

Hero Splendor XTEC BS6 II
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सर्वाधिक पसंत केली जाणारी नंबर 1 बाईक Hero Splendor आता नव्या अवतारात लाँच झाली आहे. कंपनीने Splendor चे नवे मॉडेल Super Splendor XTEC BS6 फेज II लॉन्च केलं आहे. नवनवीन फीचर्स आणि आकर्षक लूकने सुसज्ज असलेली ही बाईक 60+ मायलेज देते. हिरोची ही नवी स्प्लेंडर Honda Shine, TVS Raider आणि Bajaj CT 125X सारख्या गाडयांना थेट टक्कर देईल. चला आज आपण जाणून घेऊया या बाईकचे खास वैशिष्ठ्ये..

Hero Splendor XTEC BS6 II

लूक आणि फीचर्स –

या नव्या स्प्लेंडर मध्ये एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी डीआरएल, डिजिटल स्पीडोमीटरमधील ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट यांसारखी अनेक वैशिष्ठ्ये आहेत. यामधील हेडलाईट चे २ भाग मध्ये असलेल्या LED DRL पासून वेगळे केले आहेत. यामधील DRL मध्ये LED नेहमी चालू असते. तसेच, टर्न इंडिकेटर आणि टेल लॅम्पला हॅलोजन बल्ब मिळतात. समोरील बाजून अपडेटींग लाईटींग सोबत हेडलाइट काउल आणि व्हिझर देखील अपडेट करण्यात आले आहे.

Hero Splendor XTEC BS6 II

60+ मायलेज – Hero Splendor

बाईकच्या इंजिनमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, ते फक्त BS6 फेज IIएमिशन नॉर्म्सच्या हिशोबाने करण्यासाठी अपडेट केले गेले आहे. या स्प्लेंडरच्या नव्या बाईक मध्ये पूर्वीसारखेच १२४.७cc एअर-कूल्ड इंजिन मिळते. हे इंजिन 10.7 bhp पॉवर आणि 10.6 Nm टॉर्क जनरेट करते. या बाइकला 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. एक लिटर पेट्रोल मध्ये ही बाईक सुमारे 60+ मायलेज देते.

Hero Splendor XTEC BS6 II

गाडीच्या (Hero Splendor) लाइटिंग सेटअप आणि नवीन पूर्ण डिजिटल स्पीडोमीटरमधील बदलासह, नवीन सुपर स्प्लेंडर XTEC BS6 फेज II मॉडेलमध्ये वायरिंग देखील बदलले आहे. डिजिटल स्पीडोमीटरच्या सभोवतालची जागा अपडेट केली गेली आहे आणि एक USB चार्जिंग पोर्ट देखील आहे. कॉस्मेटिक अपडेट्सच्या बाबतीत सांगायचं झाल्यास यामध्ये नवीन रंग आणि अपडेट केलेले ग्राफिक्स आणि स्टिकरिंग आहे.

हे पण वाचा :

Gear असलेली पहिली Electric Bike लाँच, 125 किमी रेंज; किंमत किती?

Bajaj चेतक E- Scooter चे प्रीमियम एडिशन लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ठ्ये

Yamaha चा धमाका!! एकाच वेळी लॉन्च केल्या 4 Bikes; किंमत किती?

Honda Scoopy : होंडाने लाँच केली आकर्षक Scooter; पहा किंमत आणि फीचर्स