हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा नेते किरीट सोमय्या यांना दिला दिल्यानंतर आता हायकोर्टाने त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या बाजूने निर्णय देत त्यांनाही दिलासा आहे. आयएनएस विक्रांत मदतनिधी घोटाळा प्रकरणात तूर्तास कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे आदेशच मुंबई पोलीसांना आज देण्यात आलेले आहेत. मात्र, हायकोर्टाकडून निल सोमय्याना काही अटी घालण्यात आल्या आहेत. 25 एप्रिल ते 28 दरम्यान राज सकाळी ते दुपारी तपास अधिकाऱ्यांपुढे चौकशीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
निल सोमय्या यांच्या प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी पोलीस चौकशीला हजर राहत तपासांत सहकार्य करण्याचे नील सोमय्यांना न्यायालयाकडून निर्देश देण्यात आले. मात्र, अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. मात्र, 25 एप्रिल ते 28 दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 2 वाजता तपास अधिकाऱ्यांपुढे चौकशीला निल सोमय्यांना हजर रहावे लागणार आहे.
किरीट सोमय्यांपाठोपाठ त्यांचा मुलगा निल सोमय्या यांना देखील मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे. आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्याप्रकरणी आरोपांसंदर्भात तुर्तास कुठलीही कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाच्या वतीने सुनावणी दरम्यान देण्यात आले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत निधीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात सोमय्या पिता पुत्रांचा हात असून दोघांना अटक करून त्याची चौकशी करावी, अशी मागणी यावेर्ळी राऊत यांनी केली होती.