हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा दबंग स्टार म्हणून ओळख असलेलया अभिनेता सलमान खानला एका प्रकरणात दिलासा मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे. सलमानने त्याच्या पनवेल येथील फार्महाऊस शेजारील फार्महाऊसचे मालक केतन कक्कड यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. काल न्यायालय यावर निकाल देण्याची शक्यता होती. मात्र, या दाव्यावर ज्यांनी सुनावणी घेतली त्या न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांनी निकाल राखून ठेवला होता. मात्र, ते निवृत्त झाल्याने सलमानला कालही या प्रकरणात दिलासा मिळू शकलेला नाही.
पनवेलच्या फार्महाऊस परिसरातील जमिनीच्या वादाबाबात शेजारी केतन कक्कड यांनी समाज माध्यमावर बदनामीकारक पोस्ट टाकली. त्यांना अशी पोस्ट टाकण्यास मनाई करावी तसेच पोस्ट डिलीट करण्यात यावे, अशी मागणी सलमान खानने केली. मात्र, कक्कड यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. सलमान खानविरोधात केलेल्या आरोपांसंदर्भात आपल्याकडे सर्व पुरावे असल्याचा युक्तिवाद केतन कक्कड यांच्यावतीने करण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय?
सलमान खानने त्याच्या राहत असलेल्या पनवेल फार्म हाऊस येथील शेजारी केतन कक्कड यांच्यवर एक आरोप केला होता. कक्कड यांनी सोशल मीडियावर आपली बदनामी केली. कक्कड यांनी आपल्यासंबंधित टाकलेली सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट डिलिट करावी, अशी मागणीही सलमानने यापूर्वी सत्र न्यायालयात केली होती. मात्र, सत्र न्यायालयाने सलमान खानची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर सलमान खानने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालायने ही याचिका दाखल करुन घेत 1 ऑगस्ट 2022 पासून सुनावणीस सुरुवात केली.