हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Business Idea : भारतात खाण्यापिण्याशी संबंधित व्यवसाय कधीच फसत नाहीत. त्यातच जर आपल्या उत्पादनाचा दर्जा चांगला असेल तर लवकरच बाजारात त्याची चांगली ओळख देखील बनू शकेल. जर आपण एखाद्या नवीन व्यवसायाच्या शोधात असाल तर आजची ही बातमी आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल. कारण आज आपण बाजारात सतत मागणी असणाऱ्या एका व्यवसायाबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.
आपल्याला हे माहित असेलच कि, बहुतेक लोकांना सकाळच्या वेळी चहासोबत टोस्ट (Rusk) खायला आवडते. सर्व वयोगटातील लोकं ते आवडीने खातात. ज्यामुळे याला बाजारात खूप मागणी देखील असते. अशा परिस्थितीत जर टोस्ट बनवण्याचा व्यवसाय सुरू केला तर तो खूपच फायदेशीर ठरू शकेल. चला तर हा व्यवसाय कसा सुरू करावा ते समजून घेउयात…
कोणत्या गोष्टींची आवश्यक असतील
हा व्यवसाय सुरु करण्यासाठी आपल्याला कच्चा माल आणि काही मशीन्स विकत घ्याव्या लागतील. तसेच टोस्ट बनवण्यासाठी रवा, तूप, ग्लुकोज, मैदा, साखर, मिल्क कस्टर्ड, वेलची, यीस्ट, ब्रेड इंप्रूव्हर आणि मीठ लागेल. जे आपल्याला स्थानिक बाजारपेठेतून सहजरित्या खरेदी करता येतील. याशिवाय स्पायरल मिक्सर मशीन, डिव्हायडर मशीन, रस्क मोल्ड्स, रस्क स्लायसर मशीन, रोटरी रॅक ओव्हन आणि पॅकेजिंग मशीन ईत्यादींची आवश्यकता भासेल. तसेच या मशीन आपल्याला जवळच्या बाजारपेठेतून किंवा ऑनलाइन खरेदी करता येतील. New Business Idea
लायसन्स घ्यावे लागणार
हे जाणून घ्या कि, भारतात खाण्यापिण्याशी संबंधित उत्पादने बनवण्याच्या व्यवसायासाठी लायसन्सची गरज असते. म्हणूनच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वांत आधी FSSAI कडून लायसन्स घ्यावे लागेल. याशिवाय जीएसटी रजिस्ट्रेशन, उद्योग आधार सर्टिफिकेट आणि फायर ब्रिगेड विभागाकडून एनओसी सर्टिफिकेट देखील घ्यावे लागेल. New Business Idea
खर्च आणि कमाईचे गणित समजून घ्या
हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यासाठी 30 ते 35 लाख रुपये खर्च येईल. तसेच, जर काही मशीनशिवाय हा व्यवसाय सुरू केल्यास यासाठीचा खर्च 4 ते 5 लाख रुपयांनी कमी होईल. तसेच आपल्या उत्पादनाचे चांगले मार्केटिंग देखील करावे लागेल. एकदा हा व्यवसाय सुरू झाला की दरमहा लाखो रुपये कमावता येतील. New Business Idea
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/
हे पण वाचा :
Bank FD : खाजगी क्षेत्रातील ‘या’ बँकेच्या FD वर मिळत आहे 7.40% पर्यंत व्याज !!!
BSNL च्या 184 रुपयांच्या प्लॅनमध्ये 395 दिवसांसाठी मिळवा ‘हे’ फायदे
Bank Of Baroda ने ग्राहकांना दिला धक्का, आता क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरल्यास द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क
PM Svanidhi Yojana : स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार देत आहे विना गॅरंटी कर्ज, अशा प्रकारे मिळवा फायदा
Post Office Tax Saving Schemes : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजनांमधील गुंतवणूकीद्वारे वाचवता येईल टॅक्स