शाहरुख खानची लेक पुन्हा चर्चेत; ‘या’ खास व्यक्तीसोबत घालवतेय वेळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याचा पठाण चित्रपट चांगलाच गाजत आहे. दररोज हाऊसफुल्ल होत असलेल्या ‘पठाण’मुळे शाहरुखची चांगलीच चर्चा होत आहे. त्यापेक्षा जास्त आता त्याची लेक सुहाना खान हि चर्चेत आली आहे. ती नुकतीच मुंबईमधील एका कॅफेबाहेर दिसून आली असून तिच्यासोबत एका खास व्यक्तीही दिसून आला आहे.

शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही आता मोठी झाली असून ती कायम सोशल मीडियावर काही ना काही तरी व्हिडीओ, फोटो शेअर करत असते. तिच्या बॉलिवूडमधील पदार्पणाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या ‘द आर्चीज’ या चित्रपटामध्ये सुहाना खान महत्वाच्या भूमिकेत आहे.

https://www.instagram.com/reel/Cn9l59fDwAT/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading

सुहाना खान आपला भाऊ अबराम खान सोबत मुंबईतील एका कॅफेत क्वालिटी टाईम घालवण्यासाठी गेली होती. यावेळी तिला माध्यमांशी गाठले. यावेळी तिच्यासोबत तिचा लहान भाऊ अबराम देखील दिसून आला. कॅमेऱ्यांना पाहताच सुहाना लगेच गाडीत जाऊन बसली. तिने ब्लॅक आउटफिट ड्रेस घातला होता.

https://www.instagram.com/p/CULcbEXp4Sq/?utm_source=ig_web_copy_link

सुहानासोबत चित्रपटात असणार बच्चन कुटुंबातील ‘ही’ खास व्यक्ती

शाहरुखची लेक सुहाना खान हि ‘द आर्चीज’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. तिच्यासोबत चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हा देखील बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.