एक दिवस हिजाबी देशाची पंतप्रधान होईल; ओवेसींचे वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्नाटकातील हिजाब प्रकरणामुळे देशभर नवा वाद निर्माण झाला असतानाच एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोठं विधान केले आहे. एक दिवस हिजाब घातलेली मुलगी देशाची पंतप्रधान होईल अस वक्तव्य त्यांनी केलं आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी एक व्हिडिओ ट्विट करत हे विधान केले आहे.

या व्हिडिओ मध्ये ओवेसी म्हणतात, आम्ही आमच्या मुलींना शुभेच्छा देतो’ इंशाअल्लाह, जर त्यांनी अब्बा-अम्मी ठरवलं तर मी हिजाब घालेन. तर अम्मा-अब्बा म्हणतील – बेटा घाल, आम्ही बघू तुला कोण अडवते. हिजाब घालून, नकाबही घालून कॉलेजात जाईल, कलेक्टरही बनेल, बिझनेस मॅनही बनेल, एसडीएमही बनेल आणि या देशात एक दिवस मुलगी हिजाब घालून पंतप्रधान बनेल.

हिजाब प्रकरणी ओवेसींनी यापूर्वी देखील आपल मत व्यक्त केले होते. तुम्हाला देशाच्या राज्यघटनेने हक्क दिला आहे. तुम्ही चादर ओढा, नकाब ओढा की हिजाब घाला… ही आपली ओळख आहे. घाबरू नका आणि भीती बाळगू नका. ज्या मुलीने घोषणा देणाऱ्या मुलांना उत्तर दिले, तिला मी सलाम करतो, असं ओवेसी म्हणाले होते.