हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक वेरूळच्या लेणींना भेट दिली. हिलरी क्लिंटन, मंगळवारी उशिरा गुजरातहून आपल्या सेवकांसह औरंगाबादला आल्या होत्या. यावेळी त्या युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केलेल्या राष्ट्रकूटकालीन वेरूळ लेणीच्या वैभवाचा आनंद घेताना दिसल्या.
सकाळी दहाच्या वाजेच्या दरम्यान त्या वेरूळ लेणीमध्ये दाखल झाल्या. दुपारी १ वाजेपर्यंत त्यांनी वेरुळ लेणीमधील ‘कैलास’ ही १६ क्रमांकाची लेणी, तसेच १०, ३२ आणि ३४ क्रमांकाच्या बौद्ध, जैन लेणींचे शिल्पसौंदर्य पाहिले.
हिलरी क्लिंटन यांनी शेजारील गृष्णेश्वर मंदिरालाही भेट दिली, जे देशातील १२ वे ज्योतिर्लिंग आहे.
वेरूळ लेणीचे सौंदर्य पाहून हिलरी भारावून गेल्या होत्या. हे खूपच ऐतिहासिक स्थळ असल्याचे त्यांनी म्हंटल.
हिलरी क्लिंटन यांच्या दौऱ्यादरम्यान 100 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. आज त्या दिल्लीला रवाना होणार आहेत.
औरंगबादला येण्यापूर्वी त्यांनी SEWA ला ट्रेड युनियन म्हणून 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अहमदाबादमधील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. आणि गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये निधन झालेल्या संस्थापक आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या इला भट्ट यांना श्रद्धांजली वाहिली.
वेरूळ लेणीत दरवर्षी अनेक पर्यटक येतात आणि शिल्पसौंदर्यचा आनंद घेतात.