नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. खापरखेड्यातील युवा व्यापार्याने बँकेतून कर्ज काढून व्यापार सुरू केला होता. मात्र हफ्ते फेडायला उशीर होत होता. त्यामुळे वसुली पथकाने दम दिला. त्यानंतर तो अधिक डिफ्रेशनमध्ये गेला. याच नैराश्यातून त्याने जीवनाला कंटाळून तलावात उडी घेऊन आत्महत्या (Sucide) केली. हि घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे. मृत युवा व्यापाऱ्याचे नाव शुभम संजय मडावी असे आहे. शुभमचे दीड महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. त्याचे वडील संजय मडावी उपहारगृहात खाद्यपदार्थ बनविण्याचे काम करीत होते. मात्र, त्यानंतर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करायचे ठरवले आणि त्यांनी खापरखेडा मुख्य बाजारपेठेत आलू-पोहा चन्याचे दुकान लावले. कामाचा व्याप वाढला. त्यामुळं शुभम व त्याच्या आईला सोबतीला घेतले. स्वत:चे घर बांधले. शुभमला या व्यवसायात रस नव्हता. त्याने घर बँकेत गहाण ठेवून कर्ज काढले. हायटेक कॅमेरे विकत घेऊन बाजारपेठेत फोटो स्टुडिओचे दुकान लावले.
दीड महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
मृत शुभमचे दीड महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. तसेच काही बँकेचे हप्ते थकीत राहिले होते. यानंतर बँकेच्या वसुली पथकाने हप्ते वसूल करण्याचा तगादा लावला. शिवाय आठवड्यापूर्वी वसुली पथकातील एका सदस्याने त्याच्या दुकानात जाऊन त्याला दम दिला होता. त्यामुळे तो पूर्णपणे नैराश्यामध्ये गेला. यानंतर तो मंगळवारी सकाळी तो घराबाहेर पडला तो बराच वेळ झाला तरी घरी परतला नाही. यानंतर मृत शुभमच्या घरच्यांनी बुधवारी खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
घरात सुसाईड नोट सापडली
शुभमला काही दिवसांपूर्वी बँकेच्या वसुली पथकाने दम दिला होता. यानंतर तो काही दिवसांपूर्वी खापरखेडा परिसरातील खासगी डॉक्टरकडे गेला होता. बँकेचे कर्ज व वसुलीपथक धमकी देत असल्यामुळे शुभमने आत्महत्येचा (Sucide) विचार डॉक्टरांना बोलून दाखविला. त्यानंतर डॉक्टरांनी शुभमची समजूत काढली. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी घरात एका बॅगमध्ये चिठ्ठी लिहून ठेवली होती. घरात शुभमच्या मोबाईलचा शोध घेत असताना त्याच्या बॅगमध्ये शुभमच्या पत्नीला चिठ्ठी आढळली. या चिठ्ठीमध्ये आत्महत्या करण्यासाठी कारणीभूत असलेल्या वसुली पथकातील एका सदस्यच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा :
आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या
KKR चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित IPL मधून बाहेर
NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक
एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल