मुंबई । लॉकडाऊनमधून बिग बझारसारख्या स्टोअर वगळण्यात आलं आहे. काही ठरविक कालावधीत काही निर्बंध आणि अटींसह केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्रीसाठी ही रिटेल स्टोअर ग्राहकांच्या सेवेसाठी सुरु असतात. मात्र, कोरोनाचा संसर्गामुळं लोकांची स्टोरमध्ये येणाऱ्यांची संख्या कमी आहे. यातून वाट काढत बिग बझारने लॉकडाउनच्या काळात Shop.BigBazaar.com ही मोबाइल साइट सुरू केली आहे. या साईटवरून ग्राहक आता घर बसल्या बिग बझारमधून सामानाची ऑनलाईन ऑर्डर करू शकता. यासाठी ग्राहकांना फक्त आपल्या भागाचा पिन कोड टाकून आपल्या जवळचे बिग बझार स्टोअर निवडून आवश्यक वस्तू कार्ट मध्ये भरायच्या आहेत. त्यानंतर ग्राहकांना संपर्कविरहित आणि सुरक्षित ऑर्डर घरपोच दिली जाईल.
या व्यतिरिक्त ग्राहक फोन कॉलद्वारेही ऑर्डर देऊ शकतात. व्हॉट्सअप करूनही घरपोच ऑर्डर मिळवू शकतील. याव्यतिरिक्त, ग्राहक कोणत्याही बिग बझार स्टोअरमध्ये खरेदीसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी, स्टोअर पिक-अप पर्याय निवडू शकतात. त्यात ते ऑनलाइन पैसे भरू शकतील आणि फक्त ऑर्डर घेण्यासाठी स्टोअरला भेट द्यावी लागेल. मोठ्या सोसायट्यांसाठी बिग बझारने ऑन व्हील्स सेवा सादर केली आहे.
या अंतर्गत जीवनावश्यक खाद्यपदार्थ आणि किराणा आवश्यक सामान ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. बिग बझारच्या होम डिलेव्हरी सेवा ग्राहकांना देण्यामागे बाजारातील स्पर्धा सुद्धा एक कारण आहे. बिग बास्केट आणि ग्रोफर्स सारख्या कंपन्या रिटेल सामानाची डिलिव्हरी घरपोच करत आहेत. त्यामुळं स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बिग बझारने ऑनलाईन डिलिव्हरीची सेवा सुरु केली आहे असं बाजारातील सूत्रांचा म्हणणं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”