Home Insurance द्वारे अशा प्रकारे मिळेल आपल्या घरातील नुकसानीची आर्थिक भरपाई

Home Insurance
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Insurance : स्वतःचे घर खरेदी करण्याचे स्वप्न आपल्यातील प्रत्येकजण पाहत असतो. मोठ्या मेहनतीने आणि भरपूर पैसे गुंतवून आपण आपल्या स्वप्नातले घर प्रत्यक्षात उतरवतो. अशा परिस्थितीत त्याची सुरक्षेची काळजी घेणेही महत्वाचे आहे. यासाठी आजकाल अनेक कंपन्या होम इन्शुरन्सची सुविधा देखील देत आहेत. इथे हे लक्षात घ्या की, होम इन्शुरन्सद्वारे भूकंप, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्ती तसेच चोरी आणि इतर किरकोळ गोष्टींमुळे झालेल्या नुकसानीची आर्थिक भरपाई मिळण्यास मदत होते. तर आजच्या या बातमीमध्ये आपण घराचा विमा घेण्याचे फायदे जाणून घेणार आहोत…

Home Insurance: How to buy home insurance to protect against natural  calamities

Home Insurance घेणे का महत्त्वाचे आहे ???

हे लक्षात घ्या कि, ज्या प्रकारे वाहनांचा किंवा स्वतःचा विमा काढला जातो, अगदी त्याच प्रकारे घराचाही विमा उतरवला जातो. याद्वारे आपल्या घराचे नुकसान भरून काढण्यास मदत होते. कोणताही चांगला होम इन्शुरन्स नैसर्गिक आपत्तींपासून ते इतर प्रकारचे नुकसानही कव्हर करू शकतो. यामध्ये विमा कंपनीकडून आर्थिक सहाय्य दिले जाते. या प्रकारचा विमा कोणालाही घेता येऊ शकतो. तसेच या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नियमित प्रीमियम देखील भरावा लागेल.

Things You Must Know Before Buying a Home Insurance Policy | Axis Bank

होम इन्शुरन्सचे फायदे जाणून घ्या

आपल्या Home Insurance मध्ये आपले घर तसेच हॉल, गॅरेज, परिसर इ. कव्हर होते. याशिवाय एड ऑन सुविधेअंतर्गत फर्निचर आणि इतर उत्पादने देखील कव्हर केले जाऊ शकतील. तसेच याद्वारे नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसान आणि जर घरात चोरी झाली तर त्याचे नुकसानही कव्हर केले जाते. त्याच वेळी, काही विमा पॉलिसींमध्ये घरातून चोरीला गेलेल्या वस्तू कव्हर देखील केल्या जातात.

How do you secure your Home with Home Insurance?

अशा प्रकारे मिळते कव्हर

Home Insurance अंतर्गत आपल्या घराचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी इन्शुरन्स, नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी इन्शुरन्स, भाडेकरू विमा, घरमालक विमा, आपल्या घरातील सामग्रीचे संरक्षण करण्यासाठीचे इन्शुरन्सआणि घर दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीसाठीचे इन्शुरन्स कव्हर दिले जाते. त्याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की, याद्वारे आपल्या घराला होणाऱ्या कोणत्याही नुकसानीची भरपाई मिळवण्यात मदत होते.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icicilombard.com/home-insurance/bharat-griha-raksha-policy

हे पण वाचा :
Bank FD : खुशखबर !!! ‘ही’ स्मॉल फायनान्स बँक एफडीवर देत आहे 9.50% व्याजदर
Tax Saving Tips : ‘या’ 5 योजनांमध्ये गुंतवणूक करून वाचवा येईल टॅक्स, कसे ते जाणून घ्या
DigiLocker अ‍ॅपद्वारे अशाप्रकारे आपल्या स्मार्टफोनमध्ये ठेवा Driving Licence
EDLI Scheme म्हणजे काय ??? जाणून घ्या त्याच्याशी संबंधित ‘या’ खास गोष्टी
New Business Idea : घरबसल्या कमी खर्चात ‘हे’ व्यवसाय सुरू करून दरमहा मिळवा हजारो रुपयांचे उत्पन्न