हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : RBI कडून नुकतेच आपल्या रेपो दरात वाढ करण्यात आहे. ज्याचा उद्देश महागाईला नियंत्रणात ठेवणे हा आहे. रेपो दरात वाढ झाल्याचा परिणाम आता बँका आणि हाऊसिंग फायनान्सच्या व्याजदरावरही दिसून येत आहे. अशातच LIC हाऊसिंग फायनान्सने निवडक कर्जदारांच्या होम लोनवरील व्याजदरात 20 बेस पॉइंट्स म्हणजेच 0.20 टक्क्यांनी वाढ केली आहे.
शुक्रवारपासून हे सुधारित दर लागू होतील. LIC हाउसिंग फायनान्सने सांगितले की, ज्या कर्जदारांचा CIBIL स्कोअर 700 किंवा त्याहून जास्त आहे, त्यांच्यासाठी दरातील वाढ केवळ 0.20 टक्क्यांपर्यंत मर्यादित असेल. मात्र ज्या ग्राहकांचा CIBIL स्कोअर 700 पेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी 25 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे तर नवीन ग्राहकांसाठी 40 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. Home Loan
हाऊसिंग लोन देणाऱ्या HDFC लिमिटेडने देखील 1 मे 2022 रोजी आपल्या बेंचमार्क लोनच्या दरात 0.05 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे कंपनीकडून लोन घेतलेल्या सध्याच्या ग्राहकांच्या EMI मध्ये वाढ होईल. हे नवे दर 1 मेपासून लागू झाले आहेत. मात्र, नवीन ग्राहकांसाठी दर बदललेले नाहीत.Home Loan
LIC हाऊसिंग फायनान्सच्या अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.lichousing.com/
हे पण वाचा :
Guarantee-Warranty : गॅरेंटी-वॉरंटीमध्ये काय फरक आहे ??? अशा प्रकारे समजून घ्या
Bank FD Rates : FD उघडाताय… जरा थांबा !!! कोण-कोणत्या बँका जास्त व्याज देत आहेत ते पहा
Bank Holidays : उद्यापासून सलग 3 दिवस बँका राहणार बंद !!!
Internet : नेटवर्कवर आल्यानंतरही इंटरनेट चालत नाही? मोबाईलमध्ये करा ‘हे’ बदल
Google वर चुकूनही सर्च करू नका ‘या’ 3 गोष्टी, अन्यथा जावे लागेल थेट तुरुंगात