हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI कडून सहकारी बँकांकडून देण्यात येणाऱ्या Home Loan ची मर्यादा आता 100% पेक्षा जास्तीने वाढवण्यात आली आहे. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी ही घोषणा केली. RBI च्या या निर्णयानंतर आता नागरी सहकारी बँकांना 70 लाखांऐवजी 1.40 कोटी रुपयांपर्यंत तर ग्रामीण सहकारी बँकांना 30 लाखांऐवजी 75 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देता येईल. हे लक्षात घ्या कि, सहकारी बँकांची जास्तीत जास्त कर्ज देण्याची मर्यादा याआधी जवळपास दहा वर्षांपूर्वी वाढविण्यात आली होती.
घर खरेदी करणे महागणार
या निर्णयाबाबत RBI च्या गव्हर्नरनी सांगितले की, गेल्या वेळी जेव्हा सहकारी बँकांच्या कर्जाची मर्यादा वाढवली गेली तेव्हापासून घरांच्या किंमतीत खूप वाढ झाली आहे. सध्या लोकांना घर घेण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. अशातच ग्राहकांची ही वाढती गरज लक्षात घेऊनच RBI ने सहकारी बँकेकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा 100% ने वाढवली गेली आहे. Home Loan
बिल्डरांना देखील दिले जाणार कर्ज
ग्रामीण सहकारी बँकांना आता हाउसिंग प्रोजेक्ट सुरू करणाऱ्या बिल्डरांना देखील कर्ज देता येईल. सध्या सहकारी बँका कडून व्यावसायिक कर्ज दिले जात नाही. मात्र देशात परवडणाऱ्या घरांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आणि हाउसिंग सेक्टरला कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही गव्हर्नरनी यावेळी सांगितले. या निर्णयामुळे सहकारी बँकांकडून हाउसिंग सेक्टरला भरपूर कर्ज दिले जाण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. Home Loan
RBI कडून रेपो दरात वाढ
RBI कडून रेपो दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. यावेळी 50 बेसिस पॉइंट्स (.50 टक्के) वाढ झाली आहे. ज्यामुळे रेपो दर हा 4.90 टक्के झाला आहे. बुधवारी संपलेल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत RBI कडून याबाबतची माहिती देण्यात आली. Home Loan
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.codeforbanks.com/banking/loan/co-operative-bank-home-loan/
हे पण वाचा :
आता ICICI Bank च्या फिक्स डिपॉझिटवर मिळणार जास्त व्याज, नवीन दर जाणून घ्या
Credit Card युझर्सना आता UPI द्वारेही पेमेंट करता येणार !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण !!! नवीन भाव तपासा
RBI कडून रेपो दरात पुन्हा वाढ, आता EMI साठी द्यावे लागणार जास्त पैसे
Rapo Rate Hike : होम आणि ऑटो लोनवर आणखी किती व्याज द्यावे लागणार ???