पुण्यात परिक्षेत नापास झाल्याने बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – आज दुपारी बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत नापास झाल्याने नैराश्येच्या भरात एका विद्यार्थ्याने आत्महत्या (Sucide) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. निखिल लक्ष्मण नाईक असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने राहत्या इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे.

निखिलने उडी घेतली तेव्हा इमारतीखाली एक तरुण उभा होता. या तरुणावर निखिल पडल्याने तो ही जखमी झाला आहे. शेखर लहू लोणारे त्या जखमी तरुणाचे नाव आहे. त्याला उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.कोथरुड येथील श्रावणधारा वसाहतीत निखिल नाईक राहतो. गरवारे महाविद्यालयात तो वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत होता.

निखिलने या वर्षी बारावीची परीक्षा दिली होती. बारावीचा ऑनलाईन निकाल लागणार हे समजल्यावर निकालाबाबत तो खुपच उत्सुक होता. दुपारी एकच्या सुमारास ऑनलाईन निकाल पत्रिकेत नापास झाल्याचे समजताच त्याने इमारतीच्या वरच्या दिशेने जाऊन वरून उडी मारून आत्महत्या (Sucide) केली. यामध्ये निखिलचा जागीच मृत्यू झाला आहे.

हे पण वाचा :
महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीत शरद पवारांनी केले ‘हे’ आवाहन; म्हणाले…

पैगंबर वादाचे पडसाद; अल- कायदाची मुंबई- दिल्लीत आत्मघातकी हल्ल्याची धमकी

खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला चिमुकला; जवानांनी वाचवला जीव

‘जय शिवाजी’, ‘हरहर महादेव’ म्हणत कोल्हापूरच्या 80 वर्षांच्या आजीने सर केला रायगड

Sarfaraz Khan ने रचला इतिहास, ब्रॅडमननंतर ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू

Leave a Comment