हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Loan) गेल्या काही काळात महागाई इतकी वाढली आहे की सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले आहेत. एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर शंभर वेळा विचार करावा लागतो. अशावेळी स्वतःच घर घेण्याचं स्वप्न फक्त स्वप्नचं राहील का काय? असं वाटणं फार साहजिक आहे. वाढत्या महागाईमुळे घराच्या किंमती सुद्धा आभाळाला टेकल्या आहेत. त्यामुळे शहरी भागात वस्ती वाढत असली तरी महागाई काही पिच्छा सोडेना. त्यामुळे घर घेणं आता कठीण किंवा आवाक्याबाहेर आहे असे वाटू लागले आहे.
अशातच, केंद्र सरकारने गृहकर्जावर व्याज अनुदान योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जो सामान्य लोकांना घर घेण्यासाठी मदत करणार आहे. (Home Loan) शहरी भागातील घरांच्या किंमती अव्वाच्या सव्वा असल्याने लोक होम लोन काढतात. तर काही लोक कर्जाचा डोंगर नको म्हणून स्वप्नाला मागे ठेवतात आणि जबाबदाऱ्या पूर्ण करतात. अशा प्रत्येक आपल्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीसाठी सरकार ही योजना सुरु करणार आहे. लहान शहरी गृहनिर्माण क्षेत्रासाठी स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देणे हा या मागे उद्देश असेल. यासाठी सरकार ६०० दशलक्ष म्हणजेच ६०,००० कोटी रुपये इतका खर्च करणार आहे.
मोदींनी केली होती घोषणा पण..
याबाबत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती. गतवर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात त्यांनी याबाबत जाहीर घोषणा केली होती. या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले होते की, ‘आम्ही येत्या काही वर्षांत एक नवीन योजना घेऊन येत आहोत. (Home Loan) ज्याचा फायदा शहरांमध्ये राहणारे कुटुंबे, भाड्याच्या घरात राहणारी लोक, झोपडपट्ट्या, चाळी किंवा अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांना होणार आहे’. मात्र, त्यांच्या भाषणानंतर गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय किंवा अर्थ मंत्रालयाने या घोषणेबाबत वा योजनेबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्यापो दिलेली नाही.
कोणाला मिळणार लाभ? (Home Loan)
अशातच एका वृत्तानुसार, या योजनेअंतर्गत ९ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याज ३% ते ६.५% कमी दराने मिळेल असे सांगण्यात आले आहे. तसेच या योजनेच्या कक्षेत २० वर्षांसाठी ५० लाख रुपयांपेक्षा कमी गृहकर्ज आणण्याचादेखील प्रस्ताव आहे. तसेच या वृत्तात असेही म्हटले आहे की, पुढील काही महिन्यांत बॅंकेद्वारा ही योजना सुरू करण्यात येईल. शिवाय व्याज सवलतीचा लाभ लाभार्थीच्या कर्ज खात्यात आधीच जमा केला जाईल.
तसेच या योजनेचा प्रस्ताव २०२८ साठी सादर करण्यात आला आहे. त्यानुसार, त्याला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. ही योजना लागू झाल्याने शहरी भागातील कमी उत्पन्न असलेल्या २५ लाख लोकांना लाभ मिळू शकतो. वृत्तानुसार, अनुदानाची ही रक्कम घरांसाठी किती मागणी आहे यावर अवलंबून असेल असे सांगण्यात आले आहे. (Home Loan)