हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. मात्र या संकटाच्या काळात पाच राज्याच्या निवडणुका होताच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. त्यामुळे आता गृहमंत्री अमित शाह हरवले असल्याची तक्रार दिल्ली पोलिसांत करण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे सरचिटणीस नागेश करियप्पा यांनी बुधवारी अमित शाह हरवले असल्याची तक्रार दिल्ली पोलिसांकडे दाखल केली आहे. ‘कोरोना संकटाच्या काळामध्ये राजकीय नेत्यांनी देशाची सेवा करणे, लोकाच्या समस्या सोडविणे अपेक्षित आहे. अशा काळात या जबाबदारीपासून पळून जाऊ नये.’ असे या करियप्पा या तक्रारीविषयी बोलताना म्हणाले आहेत.
The National Students Union of India (@NSUI) has filed a ‘missing person report against Union Hone Minister #AmitShah (@AmitShah) with the #DelhiPolice (@DelhiPolice), over the ‘disappearance of the country's Home Minister at the time of the pandemic. pic.twitter.com/scSAaSRz4u
— IANS (@ians_india) May 12, 2021
पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर अमित शहा बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे सध्याचे सरकार आणि त्यांचे सर्वोच्च नेतृत्व गायब झाल्याबद्दल आम्ही एनएसयूआयने ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, लवकरच देशाच्या गृहमंत्र्यांना शोधलं जाईल आणि ते पुन्हा त्यांचे कर्तव्य निभावतील अशी अपेक्षा आहे असा चिमटाही त्यांनी काढला.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.