Breaking News : गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अखेर राजीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. त्यानंतर या प्रश्नी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांची अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याप्रश्नी सुमारे अर्धातास चर्चा पार पडली. त्यानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली

याला म्हणतात नैतिकता तुम्ही थेट क्लिनचीट द्यायचात; मनसेच्या फायर ब्रँड नेत्या रुपाली ठोंबरे यांचा भाजपवर निशाणा

मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी त्यांच्याकडे ऍड. जयश्री पाटील यांच्या द्वारे दाखल याचिके मध्ये आज दि. 5एप्रिल 2021 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केले आहे. त्या अनुषंगाने मी मंत्री(गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही म्हणून मी स्वतःहून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे असं अनिल देशमुख यांनी पत्रात म्हंटल आहे.

देशमुखांच्या राजीनाम्यांनंतर गृहमंत्रीपद कोणाकडे जाणार? ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत

राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी मुंबईतील बारमालकांकडून दरमहा 100 कोटी रुपये वसुली करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या, असा खळबळजनक आरोप माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केला आहे. या आरोपामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. याविरोधात हायकोर्टात याचिकाही दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने याचिका निकाली काढत 15 दिवसांत सीबीआयला प्राथमिक चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत म्हंटल आहे कि, देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पवार हे मोठे नेते आहेत. मोठ्या नेत्यांनी नैतिकता पाळणं हे संकेत आहेत. आतापर्यंत राजीनामाची मागणी केली असता कोर्टाने कुठे आदेश दिला असा सवाल केला जात होता. आता कोर्टाने आदेश दिला आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा पवारांकडे आहेत. तेच या विषयावर निर्णय घेतील. पवार साहेब आजारी आहेत, आम्हाला त्यांना त्रास द्यायचा नाही, असं ते म्हणाले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

भाजपच्या सूडाच्या राजकारणामुळेच अनिल देशमुखांचा राजीनामा” ट्वीटद्वारे अमोल मिटकरी यांनी डागली तोफ

Leave a Comment