‘कोरोना गो’चा ज्याने घेतला वसा, ग्रासले त्याच कविमित्र रामदासा, गृहमंत्र्यांकडून आठवले स्टाईल सदिच्छा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ‘गो कोरोना कोरोना गो’ असा नारा देणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. यमक अंदाजात प्रत्येक गोष्टीवर कोटी करणाऱ्या आठवलेंना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही हलक्या फुलक्या पद्धतीने काव्यात्मक सदिच्छा दिल्या आहेत.

‘‘कोरोना-गो’चा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच कविमित्र रामदासा, धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका, कोरोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का’ ” असे ट्विट करत अनिल देशमुख यांनी रामदास आठवले यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत.

सध्या आठवले यांची प्रकृती ठीक आहे. पण खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस मुंबईतील खासगी रुग्णालयात ते दाखल झाले आहेत. आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. दोघंही हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घेण्याचं आवाहन आठवले यांनी केलं आहे. (Home Minister Anil Deshmukh wishes speedy recovery to COVID Positive Minister Ramdas Athawale)

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in