हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारकडून सध्या ईडी, आयकर, एनसीबीसारख्या तपास यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर कारवाई केली जात आहे. यावरून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “केंद्रीय यंत्रणाचा उपयोग विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होतोय, हे यापूर्वी कधी होत नव्हते. मात्र, आता तशा पद्धतीचा वापर केला जात आहे हि खूप गंभीरबाब असल्याची टीका पाटील यांनी केली आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तपास यंत्रणांच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या चौकशीवरून केंद्र सरकावर टीका केली. ते म्हणाले की, केन्द्र सरकार तपास यंत्रणानाचा वापर अशा पद्धतीने करेल याबाबात कधी विचारही केला नव्हता. अशा प्रकारचे काम यापूर्वी कधी झालेही नव्हते, तसेच पाहिलेही नव्हते. मात्र, तसे आज घडत आहे.
मंत्री वळसे पाटील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्त्र नवाब मलिक आणि आर्यन खान यांच्याबाबत म्हणाले की, मलिक आणि आर्यन खान या दोघांचे विषय हे वेगवेगळे आहेत. नवाब मलिक यांचे एनसीबी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर काही आक्षेप आहेत. त्यांच्यावर आरोपही त्यांनी केले आहेत.