आधीच्या सरकारचे घोटाळे आता आम्ही बाहेर काढतोय, त्याचा आता सोमय्यांनी अभ्यास करावा ; संजय राऊतांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला पिंपरी-चिंचवडमधील स्मार्ट सिटी घोटाळा बाहेर काढला जात आहे. या प्रोजेक्टवरून आज राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना टोला लगावला. जे लोक सतत भ्रष्टाचारावर बोलतात. देशातील, राज्यातील भ्रष्टाचार संपावा असे त्यांना वाटते. त्यांनी 700 कोटींचा केलेला जो काही हा पिंपरी-चिंचवडमधील स्मार्ट सिटी घोटाळा आहे. त्याचा अभ्यास करावा. आधीच्या सरकारने जे घोटाळे करून ठेवलेत ना ते आता आम्ही हळू हळू बाहेर काढतोय, असे राऊत यांनी म्हटले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद सदाला. यावेळी ते म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमधील स्मार्ट सिटीचे टेंडर ज्या कंपनीला देण्यात आले ती क्रिस्टल कंपनी कोणाची आहे? ते आधी विरोधकांनी जाहीर करावे. मग त्या कंपनीचे इतर घोटाळे आम्ही जाहीर करू. भ्रष्टाचार हा कोणत्याही राजकीय पक्षाचा, धर्माचा आणि जातीचा नसतो.

भ्रष्टाचाराबाबत तक्रार कोणाकडे करायची? कशा पद्धतीने करायची? हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. कोणते कागद लावायचे हेही आम्हाला माहीत आहे. मात्र, तुमची काय एक्सपर्ट कॉमेंट आहे ती आम्हाला समजून घ्यायची आहे, असा टोला राऊत यांनी यावेळी सोमय्या यांना लगावला.

100 कोटी लसीकरणाचे लक्ष्य खरोखरच पूर्ण झालंय का? – राऊत

भारताने काल 100 कोटी जनतेचे लसीकरण करण्याचा महत्वपूर्ण टप्पा पार केला. हि एका प्रकारची ऐतिहासिक कामगिरी होती. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 100 कोटी डोस खरोखरच पूर्ण झाले आहेत का? झाले असतील तर आनंदच आहे. अजूनही काही लोक 100 कोटी पूर्ण न झाल्याचे बोल्ट आहेत. या संदर्भात वेगवेगळे आकडे बाहेर असल्याचे सांगत केंद्र सरकारला टोला लगावला.

Leave a Comment