बारीक आहात?? वजन वाढवण्यासाठी खावा ‘हे’ पदार्थ

weight
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । वजन वाढणं जशी काही जणांसाठी समस्या असते त्याचप्रमाणे खूप काही खाऊन सुद्धा वजन न वाढ हि सुद्धा काही जणांसाठी समस्या असते. भरपूर काही खाऊन देखील असे अनेक जण असतात ज्यांचे वजनच वाढत नाही. चुकीचे खाणे, झोप पूर्ण न होणे, अनुवांशिक हार्मोन अशा विविध कारणांनी आपले वजन वाढत नाही. अशावेळी आज आम्ही तुम्हांला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याद्वारे तुमचं वजन वाढण्यास मदत होईल.

दही, लोणी, दूध- 

वजन वाढवण्यासाठी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. व्यायाम केल्याने शरीर मजबूत होते आणि तुम्हाला चांगली भूकही लागेल. वजन वाढवण्यासाठी तुम्हाला जास्त कॅलरीयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. भाकरी, भात, बटाटा, दूध, रताळे यांचा समावेश आपल्या आहारात करावा. तसेच दही, चीज, तूप, ब्रेड, लोणी खावे. याशिवाय केळी, आंबा, चिकू, लिची, खजूर ही फळे खावीत.

boiled egg

अंडी-

जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर वजन वाढवण्यासाठी तुम्ही अंडी खाणे खूप गरजेचं आहे. अंड्यात पर्याप्त प्रमाणात कॅलरी, फॅट आणि प्रोटीन असतात. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी अंडे वरदान मानले जाते. अंड्यातील प्रथिने स्नायूंचा आकार वाढवतात आणि शरीराला ऊर्जा प्रदान करतात. शक्यतो अंडे उकडून त्यातील पांढरा भाग खावा आणि आतील पिवळा भाग टाळा.

suka meva

सुका मेवा-

वजन वाढवण्यासाठी एक सोपा पर्याय म्हणजे सुका मेवा. यामध्ये कॅलरी, फायबर आणि पोषकतत्त्वे असतात .सुक्या मेव्या मध्ये बदाम, काजू, मनुके अक्रोड, इत्यादींचा समावेश होतो.याचे सेवन वजन वाढवण्यास नक्कीच मदत करते.

banana

केळी-

वजन वाढवण्यासाठी स्वस्तात मस्त पदार्थ म्हणजे केळी. केळ्यात असणारे कॅलरीज, कार्बोहायड्रेट, पोटॅशियम यामुळे शरीराला एनर्जी तर मिळतेच आणि वजन वाढवण्यासाठीही मदत होते. केळी खाल्ल्याने हाडेही मजबूत होतील. एक केळे खाल्ल्याने ९०हून अधिक कॅलरीज तर २० ग्रॅमहून अधिक कार्ब्स मिळतात.