हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । तोंड आणि याचे आजार हे काही आपल्यासाठी नवीन नाहीत. तोंडाचा जर एखादा आजार झाला तर त्यावेळी प्रत्येकाला खूप त्रास सहन करावा लागतो ना कि धड बोलता येत नाही खाता येत त्यामुळे यावर योग्य प्रकारचा उपाय असणे गरजेचे आहे. या आजारामध्ये तोंडातल्या आतील भागाला त्रास दायक वेदना होण्यास सुरवात होतात. अल्सर पोषणघटकांच्या कमतरतेमुळे उद्भवतात अशांना मल्टीव्हिटामिन्सच्या गोळ्या घेतल्याने आराम मिळण्यास मदत होते. मात्र माऊथ अल्सरच्या समस्येशी सामना करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायदेखील करू शकता.
माऊथ अल्सरमुळे जर खूपच वेदना होत असतील, तर बर्फाचा लहानसा गोळा घेऊन, त्याजागी फिरवा आणि थंड पाण्याने चूळ भरून टाका. लवंग चघळल्यानेदेखील वेदना कमी होण्यास मदत होते. लवंग चघळल्यानंतर त्याचा रस, अल्सर झालेल्या भागाकडे जाऊ द्या. कोमट पाण्याचा काही
प्रमाणातील मात्र हा चूळ भरण्यासाठी तयार करा. अल्सर झालेल्या भागाला संसर्ग होऊ नये म्हणून मीठाच्या पाण्याने चूळ भरा.यामुळे अल्सर लगेच कमी होणार नाही, परंतू वेदना कमी होण्यास मद्त होइल हे लक्षात ठेवा.
मध—
मध याचा वापर केल्याने डीहायड्रेशनच्या त्रासापासून आराम मिळण्यास मदत होते. मधामुळे व्रण जाण्यास मदत होते तसेच नव्या टिश्यूंची निर्मीती व वाढ होण्यास मदत होते. मधातील अॅन्टी-मायक्रोबियल घटकांमुळे माऊथ अल्सर लवकर बरे होण्यास मदत होते.
तुळस—
सर्व आजरांवर रामबाण उपाय म्हणजे तुळस . तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. तुळसीच्या पानांमुळे ताण कमी करण्यास मदत होते.
नारळ —–
सुके खोबरे, खोबर्याचे तेल तसेच नारळाचे पाणी हे तीनही घटक माऊथ अल्सरपासून आराम मिळवण्यास मदत करतात. शहाळं याचे पाणी सुद्धा आरोग्यासाठी लाभकारक आहे. याचा वापर केल्याने अल्सरपासून देखील आराम मिळतो.
खसखस —
खसखस शरीरात थंडावा निर्माण करण्यास मदत करतो. शरीरात तयार होणारी उष्णता यामुळे सुद्धा माउस अल्सर चा त्रास जाणवू शकतो. आहारात खसखस वापरून त्यामध्ये साखर टाकून याचा वापर आहारात करा.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’