हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। मूळव्याध हा सामान्य आजार जरी असला तरी त्याच्या त्रास हा जास्त प्रमाणात होत असतो. मूलव्याधीचे अनेक प्रकार आहेत. ते शरीराच्या अवघड जागेवर त्याचा त्रास होतो. त्यामुळे शौचास जाण्याचा त्रास नाहक होतो. त्यावर वेळेत उपाय केले असता , जास्त प्रमाणात त्रास होणे कमी होते. मूळव्याध हा आजार असा आहे की, त्या संदर्भात कोणत्याही प्रकारे उघड बोलत येत नाही. त्यासाठी घरगुती कोणते उपाय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
कडुलिंब—-
कडुलिंबाच्या लिंबोळ्या काढून आणून त्याची साल काढून त्याचा ते छोट्या भागात किंवा कुटून बारीक केले पाहिजे. हे बीज कुटून त्याचा बारीक भुगा करा आणि त्याच्या गोळ्या छोट्या छोट्या करा. दररोज एक गोळी ही दुधासोबत घ्या , त्याने शरीराला आराम मिळू शकतो. हा घरगुती उपाय करताना आहाराचे पथ्यपाणी पाळले गेले पाहिजे . मांसाहार जास्त करू नये त्यामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता असते तसेच ते पचायला फार अवघड जाते. जड जे पदार्थ आहेत ते खाल्ले जाऊ नयेत.
रुईच्या चीक—-
ज्या भागात त्रास होत आहे . त्या भागामध्ये रुईच्या चीक काढून त्याचा एक दोन थेंब त्या भागात लावा आपोआप त्याचा त्रास कमी होण्यास सुरुवात होईल. कमीत कमी सात दिवस हा प्रयोग दररोज केला जावा . त्याने शरीराला आराम मिळेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’