Honda Dio Vs Hero XOOM : कोणती गाडी Best? पहा संपूर्ण तुलना

Honda Dio Vs Hero XOOM
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक वर्षात हिरो होंडाने (Hero Honda) भारतात एकत्रपणे काम केलं आणि आपल्या अनेक गाड्या बाजारात आणल्या. मात्र २०११ ला एकमेकांपासून सेपरेट झाल्यांनतर हिरो आणि होंडा कंपनी आता एकमेकांची स्पर्धक बनली आहे. स्कुटर असो किंवा बाईक या दोन्ही कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. आज आपण हिरोने नुकतीच लॉन्च केलेली XOOM आणि होंडा Dio यांची तुलना करणार (Honda Dio Vs Hero XOOM) आहोत. यांनतर तुम्हीच ठरवा कि तुमच्यासाठी कोणती गाडी योग्य आहे.

गाडीचे लूक –

लूकबाबत सांगायचं झाल्यास, दोन्ही स्कूटरचे डिझाइन अतिशय अग्रेसिव्ह आणि फ्रंट-एंडसह स्पोर्टी दिसते. डिओने अजूनही त्यांचे डिझाईन जास्त असं अपडेट केलेलं नाही. परंतु दिसायला ते छानच आहे. तर दुसरीकडे हिरो Xoom सुद्धा अतिशय स्पोर्टी लूकने सुसज्ज आहे. Xoom मध्ये कंपनीने हेडलॅम्प आणि टेल लॅम्पमध्ये X-आकाराचे इलेमेंट वापरले आहेत

इंजिन – Honda Dio Vs Hero XOOM

इंजिनबद्दल सांगायचं झाल्यास, दोन्ही स्कूटरला 110 cc, एअर-कूल्ड इंजिन मिळते. यामधील हिरो Xoom 7,250 rpm वर 8.05 bhp आणि 5,750 rpm वर 8.70 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. तर दुसरीकडे, होंडाची Dio चे इंजिन 8,000 rpm वर 7.65 bhp आणि 4,750 rpm वर 9 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते.

अन्य फीचर्स –

होंडा डिओ सायलेंट स्टार्ट सिस्टम, (Honda Dio Vs Hero XOOM) एक्सटर्नल फ्युएल लिड, हॅलोजन हेडलॅम्प, अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विचसह सुसज्ज आहे. तर Hero Xoom मध्ये प्रोजेक्टर LED हेडलॅम्प, LED टेल लॅम्प आणि Digi-analogue इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे जे कमी-इंधन निर्देशक आणि रिअल-टाइम इंधन कार्यक्षमता दर्शवते.

किंमत –

दोन्ही गाड्यांच्या किंमतीची तुलना करायची (Honda Dio Vs Hero XOOM) झाल्यास, Honda Dio च्या स्टॅंडर्ड व्हेरिएंटची किंमत 68,625 आहे तर DLX प्रकारची किंमत 72,626 आहे. तर दुसरीकडे हिरो Xoom तीन प्रकारांमध्ये खरेदी करता येईल. यामधील LX ची किंमत 68,599 आहे, VX ची किंमत 71,799 आहे आणि ZX ची किंमत 76,699 आहे.

हे पण वाचा :

Ather इलेक्ट्रिक स्कुटरवर बंपर Discount; इतक्या रुपयांनी मिळणार स्वस्त

Gold Car : दुबईच्या शेखसाठी सोन्याची गाडी कोण बनवते ??? त्यासाठी किती सोने लागते ??? जाणून घ्या त्याविषयीची माहिती

Hero Xoom : हिरोची ही दमदार Scooter Activa ला देणार तगडी टक्कर; किंमतही कमी

Mihos Electric Scooter : Free मध्ये बुक करा ही Electric Scooter; 100 किलोमीटर रेंज