Honda N7X : होंडाची ‘ही’ नवीन SUV देणार Mahindra XUV700 ला तगडी फाईट; जाणून घ्या किंमत अन लॉंचची तारीख

Honda N7X
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 4 चाकी कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जपानची दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी होंडा (Honda N7X) भारतात नवीन कॉम्पॅक्ट SUV लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Honda लवकरच नवीन SUV Honda N7X लॉन्च करणार आहे. होंडाची ही गाडी Tata Motors च्या Tata Harrier, Hyundai Creta, Kia Motors च्या Kia Seltos आणि Mahindra च्या XUV700, Maruti Brezza आणि Tata Nexon सारख्या वाहनांना जोरदार टक्कर देईल. चला जाणून घेऊया या गाडीची वैशिष्ट्ये …

5-7 सीटर मध्ये असेल Honda N7X-

Honda ची आगामी (Honda N7X) SUV 5 सीटर आणि 7 सीटर पर्यायांमध्ये असू शकते. गाडीच्या लूक आणि वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Honda N7X ला मोठे मल्टी-स्लॅट क्रोम ग्रिल, LED हेडलॅम्प, L-आकाराचे LED DRLs आणि Honda City आणि Civic Premium sedans सारख्या बंपरमध्ये फॉग लॅम्प मिळतील. स्पोर्टी दिसणाऱ्या एसयूव्हीमध्ये मोठ्या ग्रीनहाऊससह झेड-आकाराचे टेललॅम्प, ड्युअल टोन डोअर माउंटेड विंग मिरर आणि मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स मिळतील.

Honda N7X

कसे असेल गाडीचे इंजिन- (Honda N7X)

गाडीच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, Honda N7X SUV 1.5-लीटर पेट्रोल इंजिनसह दिली जाऊ शकते. हे 6- स्पीड मॅन्युअल किंवा कंटीन्यूअसली व्हेरिएबल ट्रान्समिशन-CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिले जाऊ शकते. Honda N7X ही S, E, Prestige आणि Prestige HS सारख्या ट्रिम पर्यायांसह येऊ शकते. तसेच या कार यामध्ये मोठ्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एकाधिक एअरबॅग्जसह अनेक मानक आणि सुरक्षा वैशिष्ट्ये असणार आहेत.

Honda N7X

काय असेल किंमत-

ऑटो एक्सपर्ट्सच्या मते Honda S7X SUV या कारची विक्री (Honda N7X) 12 लाख रुपयांच्या रेंजमध्ये केली जाऊ शकते.

हे पण वाचा : 

Mahindra Cars Price: Bolero पासून Scorpio पर्यंत महिंद्राच्या सर्व 10 गाड्यांच्या नव्या किंमती काय? फक्त 2 मिनिटांत घ्या जाणुन

New Mahindra Scorpio: नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ लवकरच लाँच होणार; पहा काय आहेत गाडीची वैशिष्ट्ये

Kia Carens CNG : कियाची कॅरेन्स लवकरच येणार सीएनजी मध्ये; Ertiga ला देणार तगडी फाईट

Best 7 Seater Car : मारुतीच्या Ertigaची किंमत फक्त 2 लाखांपासून सुरू; पहा कुठे आहे ‘ही’ ऑफर

Maruti Suzuki Alto: मारुतीची Alto नव्या अवतारात येणार; पहा वैशिष्ट्ये आणि किंमत