व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

थरारक! रिव्हॉल्व्हर लावून व्यापाऱ्याचे सात लाख लुटले

जालना – शहरातील प्रसिद्ध किराणा तसेच सिमेंटचे व्यापारी अमित अशोक अग्रवाल हे त्यांची दुकान बंद करून घरी जात असताना त्यांना संतोषी माता मंदिर मार्गावर लुटले. त्यांच्या पायावर प्रथम लोखंडी रॉड ने मारून त्यांना जखमी केले. आणि नंतर रिव्हॉल्व्हर लावून त्यांच्याकडील सात लाख रुपये असलेली बॅग आणि दुचाकी घेऊन दोन चोरटे पसार झाले. ही घटना काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे शहरातील व्यापारी धास्तावले आहेत.
मोंढ्यातील तिरुपती ट्रेडर्स चे संचालक अमित अग्रवाल हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून मिशन हॉस्पिटल येथील निवासस्थानी गोल्डनजुबिली शाळेच्या मार्गावरुन दुचाकीवरून घरी जात होते. त्यांना निर्मनुष्य असलेल्या मार्गावर दोन चोरट्यांनी अडवून आधी अमित अग्रवाल यांच्या पायावर वार केला. त्यात ते जखमी झाले. अशाही स्थितीत त्यांनी रोख रक्कम असलेली बॅग देण्यास नकार दिल्यावर दोन चोरट्यांपैकी एकाने त्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून बॅग आणि दुचाकी दोन्ही घेऊन तिथून सूर्या हॉटेलकडे पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अग्रवाल यांच्याकडून आरोपींची प्राथमिक माहिती घेऊन परिसराची नाकाबंदी केली होती. मात्र उशिरापर्यंत आरोपींचा शोध लागला नव्हता.