Honda SP125 ही बाईक भारतात 2 व्हेरिएंटमध्ये लॉन्च, पहा किंमत अन् फीचर्स

Honda SP125
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Honda SP125: देशातील दुचाकी उत्पादकांमध्ये Honda कंपनीचे नाव आघाडीवर आहे. आता या होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाकडून 2023 Honda SP125 ही नवीन गाडी लाँच करण्यात आली आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 85,131 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीकडून ही बाईक ड्रम आणि डिस्क अशा 2 व्हेरिएंटमध्ये लाँच केली गेली आहे. यामधील डिस्क ब्रेक असलेल्या व्हेरिएंटची (एक्स-शोरूम) किंमत आहे 89,131 रुपये असेल. तसेच ही बाईक 5 रंगांमध्ये उपलब्ध असेल. ज्यामध्ये ब्लॅक, मॅट एक्सिस ग्रे मेटॅलिक, पर्ल सायरन ब्लू, इम्पीरियल रेड मेटॅलिक, इम्पीरियल रेड मेटॅलिक आणि नवीन मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक या रंगांचा समावेश आहे.

Honda SP 125 available with cashback up to Rs 5,000 - BikeWale

इंजिन बाबत जाणून घ्या

या दुचाकी उत्पादकाकडून या नवीन 2023 SP125 बाईकमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. ही बाईक 7,500 rpm वर 10.72 bhp आणि 6,000 rpm वर 10.9 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. जे 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले गेलेले आहेत. तसेच याच्या इंजिनलमध्ये फ्युएल इंजेक्शन, ईएसपी आणि एसीजी स्टार्टर मोटर देण्यात आली आहे. याद्वारे हळुवारपणे आणि झटके न लागत स्टार्टिंगला चालना मिळते. होंडाकडून आता इंधन टाकीच्या बाहेरील इंधन पंप बदलण्यात आला आहे. Honda SP125

लॉन्च के 5 महीने बाद सामने आया Honda SP125 में मिलने वाला ये फीचर! किसी… –  Motor Radar

फीचर्स बाबत जाणून घ्या

या नवीन Honda SP125 मध्ये इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच, इंटिग्रेटेड हेडलॅम्प बीम आणि पासिंग स्विच, LED हेडलॅम्प, साइड स्टँड कट ऑफ आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहेत. यासोबतच एक डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील देण्यात आला आहे. याद्वारे सरासरी इंधनाची कार्यक्षमता, रिअल-टाइम इंधनाची कार्यक्षमता, ईसीओ इंडिकेटर, गिअर पोझिशन इंडिकेटर आणि सर्व्हिस ड्यू रिमाइंडर या गोष्टींची माहिती देतो.

Honda SP 125 Bike Price in Ranchi, Jharkhand - CN Honda

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.honda2wheelersindia.com/SP-125/

हे पण वाचा :
Maruti Suzuki : कंपनीने घेतला मोठा निर्णय; आजपासून गाड्यांचे किंमतीत झाले बदल, चेक करा..
Ration Card : केंद्र सरकारच्या निर्णयामुळे रेशनकार्ड धारक खूश; नवीन नियम जाणुन घ्या
Mahila Samman Savings Certificate योजना झाली सुरु, याद्वारे कसा फायदा मिळेल ते पहा
Multibagger Stock : गोदरेज ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने गेल्या 22 वर्षात दिला 23404 टक्क्यांहून जास्त रिटर्न
Trade in Rupees : खुशखबर !!! आता पहिल्यांदाच भारतीय रुपयांत होणार परदेशी व्यापार, भारत-मलेशियामध्ये झाला मोठा करार