हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील (HOP OXO Electric Bike) सर्वात वेगाने वाढणारी इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी Hop Electricने आज आपल्या फ्लॅगशिप हाय-स्पीड ई-बाईक, HOP OXO ची डिलिव्हरी सुरू केली आहे . हि इलेक्ट्रिक बाईक लॉन्च झाल्यापासून आत्तापर्यंत १० हजार लोकांनी बुकिंग केलं होत. सध्या कंपनीने जयपूरमधील ग्राहकांना 2500 युनिट्स डिलिव्हरी केली आहे. येत्या काही दिवसात उत्तर प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये देखील गाडीची डिलिव्हरी सुरु करण्यात येईल.
किंमत –
Hop OXO ई-बाईक या वर्षी 5 सप्टेंबर रोजी लॉन्च करण्यात (HOP OXO Electric Bike) आली होती. ऑक्सो आणि ऑक्सो एक्स या दोन व्हेरिएन्ट मध्ये ही बाईक लॉन्च झाली आहे. Hop OXO इलेक्ट्रिक बाईकची किंमत 1.25 लाख रुपये आहे. ही बाईक कंपनीच्या डीलरशिपवरून किंवा वेबसाइटवर ऑनलाइन खरेदी केली जाऊ शकते.
150 किमीचे मायलेज-
या इलेक्ट्रिक बाइकमध्ये 3.75 kWh ची पॉवरफुल लिथियम-आयन बॅटरी बसवण्यात आली आहे, या बॅटरीला 0 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी 4 तास वेळ लागतो. तर 100 टक्के चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात. (HOP OXO Electric Bike) बाइकची बॅटरी कोणत्याही 16 amp वॉल सॉकेटमधून चार्ज केली जाऊ शकते. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक बाईक तब्बल 150 किमीचे मायलेज देते. HOP OXO बाइकचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. ही इलेक्ट्रिक बाईक अवघ्या 4 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग पकडू शकते.
फीचर्स-
फीचर्सच्या बाबतीत सांगायचं झाल्यास या बाईकमध्ये इको, पॉवर आणि स्पोर्ट असे तीन राइड मोड आहेत. Hop Oxo इलेक्ट्रिक बाईक 4G कनेक्टिव्हिटी, मल्टी-मोड रीजनरेटिव्ह ब्रेकिंग, अँटी थेफ्ट सिस्टम, स्पीड कंट्रोल, जिओ-फेन्सिंग आणि राइड स्टॅटिस्टिक्ससह येते.
हे पण वाचा :
Electric Bike : 307 किमी मायलेज देणारी Electric Bike लॉन्च; पहा किंमत
Ola Electric Bike : E- Scooter नंतर OLA आणणार इलेक्ट्रिक Bike; कधी होणार लॉन्च?
Electric Bike : देशातील पहिली Gear वाली Electric Bike सादर; किती आहे मायलेज?
BMW Electric Scooter : BMW घेऊन येतेय Electric Scooter; दमदार लूक अन् जबरदस्त मायलेज