चंद्रपूरमध्ये विचित्र अपघात ! घटना CCTVमध्ये कैद

Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात एक विचित्र अपघात (Accident) घडला आहे. यामध्ये एक भरधाव वेगाने येणारी कार एका दुचाकीस्वाराला ओलांडून दुभाजकावर धडकली. या अपघातात अगदी थोडक्यात बचावलेला दुचाकीवरील युवक काही घडलेच नाही असे भासवत भरधाव वेगात पुढे निघूनही गेला. तर ती भरधाव कार दुभाजकावर धडकल्याने वाहतूक खांब कोसळून पलटी झाली. सुदैवाने या अपघातात (Accident) गाडीतील कोणालाही इजा झाली नाही. हि संपूर्ण घटना त्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात
हि अपघातग्रस्त कार यवतमाळमधील एका व्यापाऱ्याची आहे. हा व्यापारी आपल्या कारमधून कुटुंबासोबत सिरोंचाच्या दिशेने चालला होता. या कारमध्ये एकूण चार लोक होते. हि कार बल्लारपूर शहरातील मुख्य रस्त्यावर आल्यानंतर कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती दुचाकीस्वाराला ओलांडून दुभाजकावर जाऊन धडकली.

सुदैव म्हणजे एवढा भयानक अपघात (Accident) घडूनही दुचाकीस्वार किंवा कारमधील कुणालाही साधे खरचटले देखील नाही. दुचाकीस्वारही दुचाकी उटलून पुन्हा भरधाव वेगात निघून गेला. तर कार दुभाजकावर धडकल्याने वाहतूक खांब कोसळून कार पलटी झाली. हि संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हे पण वाचा :
एकवीरेला चाललेल्या कारने बोरघाटात घेतला पेट, व्हिडिओ आला समोर

‘या’ देशात चक्क युरीनपासून बनवली जाते बिअर !!! तुम्ही ते पिण्याचे धाडस कराल का???

पेट्रोल पंपावर आग लागताच धावू लागले लोक, धाडसी महिलेनं वाचवला सगळ्यांचा जीव

एका महिन्यात ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 158.59% रिटर्न !!!

Online Shopping वेबसाइट्सवरील fake reviews ना आळा घालण्यासाठी सरकारने उचलले ‘हे’ पाऊल