मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आज काळ बदलला असला तरी काही ठिकाणी अजून जुन्या रूढी परंपरा अजून कायम आहेत. त्यापैकीच एक म्हणजे प्रेम विवाहाला होणारा विरोध. घरच्यांचा विरोध पत्कारून प्रेम विवाह केलेल्या जोडप्यांना किंवा दोघांपैकी एकाला जीव (Murder) गमावावा लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशीच घटना पंजाब मधील तरनतारन जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये प्रेमविवाह केला म्हणून बहिणीची तिच्या भावांनी भर बजारात धारधार शस्त्रांनी हत्या (Murder) केली आहे. या तरुणीचे 3 महिन्यांपूर्वीच प्रियकरासोबत लग्न झाले होते.
तरूणीच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नव्हते. याच नाराजीतून तिच्या सख्या आणि चुलत भावानी मिळून तरूणीची भर बाजारात हत्या (Murder) केली. स्नेहा असे या मृत तरुणीचे नाव आहे. स्नेहाचे राजन जोशन या तरूणावर प्रेम होते. स्नेहाचे हे प्रेम प्रकरण तिच्या घरच्यांना मान्य नव्हते. त्यांनी तिला लग्नाला परवानगी नाकारली होती. यानंतर घरच्यांचा विरोधाला न जुमानता स्नेहानं तीन महिन्यांपूर्वी स्थानिक कोर्टात आपल्या प्रियकरासोबत लग्न केले.
शुक्रवारी रात्री स्नेहा काही सामान घेण्यासाठी बाजारात गेली होती. त्यावेळी तिथे दबा धरून बसलेल्या तिच्या भावांनी स्नेहावर भर बाजारात धारधार शस्त्रांनी हल्ला करत तिची हत्या (Murder) केली. या हल्ल्यानंतर स्नेहा पाच मिनिट तडफडत होती पण कुणीही तिला मदत केली नाही. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्याअगोदरच तिचा मृत्यू झाला होता. या हत्येप्रकरणी तरूणीचा सख्या भाऊ रोहित आणि चुलत भाऊ अमर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही आरोपी भाऊ सध्या फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
हे पण वाचा :
घसरत्या बाजाराची येत्या आठवड्यात वाटचाल कशी राहील ???
नवरदेवाला लग्नाचा अतिउत्साह पडला महागात, 2 लाखांचा बसला दंड
Airtel ने ग्राहकांना दिला धक्का ! आता पोस्टपेड प्लॅन 200 रुपयांनी महागले
भिवंडीमध्ये सडलेल्या फळांचा ज्युस विकत होता फळ विक्रेता, किळसवाणा व्हिडिओ आला समोर