कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यात्रांसह उत्सवावरही निर्बंधाचे सावट असणार आहे. त्यातच गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने उद्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून शहरातील प्रीतिसंगम बाग आणि पी. डी. पाटील उद्यान नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे.
गतवर्षी कोरोना संक्रमणाचा वेग वाढल्यानंतर शहरातील बगीचे बंद करण्यात आले होते. संक्रमण मंदावल्यानंतर पुन्हा उद्याने खुली करण्यात आली. गत चार महिन्यांपासून बगीचे नागरिकांसाठी खुले होते. दररोज बगिच्यांमध्ये नागरिकांची फिरण्यासाठी गर्दी होत होती. मात्र, सध्या जिल्ह्याचा ‘पॉझिटिव्हिटी रेट’ दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे प्रशासनाने निर्बंध घालण्यास सुरूवात केली आहे.
कराडातील उद्याने गुरुवारपासून नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आता गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्यास प्रारंभ झाला आहे. शहरातील उद्याने गुरुवारपासून बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.