हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखादा भूकंप झाला कि पत्याप्रमाणे इमारती कोसळताना आपण पाहिल्या असतील. पण एका भाजप नेत्यावर कारवाई करत त्याचे अनधिकृत हॉटेल पानाच्या पत्याप्रमाणे पाडण्यात आले आहे. मध्य प्रदेशात भाजपा नेत्याच्या अनधिकृत हॉटेलवर कारवाई करण्यात आली असून त्याचे हॉटेल पाडतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
इंदूरमधील विशेष पथकाने मंगळवारी संध्याकाळी 60 डायनाईटचा वापर करत भाजपाचे निलंबित नेते मिश्री चंद गुप्ता हॉटेल उद्ध्वस्त केले. यानंतर काही सेकंदातच हॉटेल जमीनदोस्त झाले. जिल्हाधिकारी दीपक आर्या, उपमहानिरीक्षक तरुण नायक आणि इतर वरिष्ठ अधिकारी आदींचीही यावेळी उपस्थिती होती.
MP: Hotel of BJP leader, accused of murder razed with dynamites in Sagar
Read @ANI Story | https://t.co/NA5gtHTF2O#MadhyaPradesh #Sagar pic.twitter.com/sD9oX2co5x
— ANI Digital (@ani_digital) January 4, 2023
ज्या भाजप नेत्याच्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली ते अद्यापही बेपत्ता आहेत.
22 डिसेंबरला कोरेगावमधील रहिवासी जगदीश यादव यांची गाडीखाली चिरडून हत्या करण्यात आली. भाजपा नेते मिश्री चंद गुप्ता आणि कुटुंबावर याप्रकरणी आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मिश्री चंद गुप्ता अद्यापही बेपत्ता आहेत.