IPS मोक्षदा पाटील अन् IAS आस्तिक कुमार पाण्डेय याची प्रेमकहाणी कशी जुळली? जाणून घ्या काय Love Story

0
218
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएस मोक्षदा पाटील आणि आयएएस आस्तिक कुमार पांडे ही दोन नावे तुम्ही महाराष्ट्रात असाल तर, कुठे ना कुठे ऐकले असेल. मोक्षदा पाटील यांचे नाव धडाकेबाज कारवाई साठी आणि आस्तिक कुमार पांडे यांचे कठोर प्रशासनसाठी नेहमी चर्चा होत असते. पण आज आपण जाणून घेणार आहोत या दोघांची प्रेम कहाणी कशी आणि कुठे जुळली याबाबत..

मोक्षदा पाटील आणि अस्तिक कुमार हे दोघेही एका बॅचचे अधिकारी आहेत. यांची पहिली भेट मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकॅडमीमध्ये फाउंडेशन कोर्स मध्ये झाली. ओळखीतून मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही दिवसानंतर लग्नाच्या गाठी मध्ये अडकले. तेव्हापासून आजपर्यंत आठ वर्षाचा संसारात आणि देशसेवा सांभाळून दोघे एकमेकांसोबत आहेत. एकमेकांना प्रोत्साहन देत आहेत.

लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकॅडमी मध्ये मोक्षादा पाटील यांना भेटण्यासाठी त्यांचे वडील आले असताना आस्तिक पांडे यांनी त्यांची भेट घेतली. त्यांनतर त्याच्या प्रेमाबद्दल सांगितले. आणि वडिलांनीही त्यांची चौकशी केल्यानंतर होकार कळवला. त्यानंतर दोघेही लग्नाच्या गाठीत अडकले. आता दोघाचीही पोस्टिंग औरंगाबादमध्ये असून आस्तिक पांडे हे औरंगाबाद महापालिका आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. तर मोक्षदा पाटील या औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक म्हणून सेवा देत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here