अक्षयने माझा वापर करून मला सोडून दिले; शिल्पा शेट्टीचा अक्षय कुमारवर गंभीर आरोप

मुंबई |  खिलाडी कुमारला अनेक लोक त्याच्या अभिनयामुळे आणि स्टंटमुळे ओळखतात. यासोबतच त्याला अनेक प्रेमप्रकणासाठीही ओळखले जाते. त्याचे नाव अनेक महिला अभिनेत्रींसोबत जोडले गेले. त्यातील शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमारच्या प्रेमाचे किस्से आजही सिने रसिकांच्या चर्चेत असतात. असाच एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये शिल्पा शेट्टी अक्षय कुमारवर त्याने वापर करून घेतला असल्याचा आरोप करते आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये ती सांगते आहे की, ‘ती त्यावेळी प्रेमात पूर्णपणे बुडून गेली होती. अक्षय तिच्यासाठी सर्वस्व होता. पण ट्विंकल खन्नासोबत लग्न करून अक्षयने माझ्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा करून टाकला. अक्षय हा प्रत्येक प्रेयसीसोबत तिचा विश्वास जिंकून साखरपुडा करून घ्यायचा. सिद्धिविनायक मंदिरात घेऊन जाऊन वचने द्यायचा पण लग्न करायचा नाही’.

अक्षयच्या प्रेमकहान्या त्यावेळी जोरावर होत्या. अक्षय प्रत्येकीला साखरपुडा करवून घ्यायचा आणि त्यांच्याशी लग्न करण्यासाठी अडकवून ठेवायचा. पण एखादी मुलगी त्याला आवडली तर तो पहिल्या मुलीला लग्नाला नकार देत असे असेही शिल्पा या व्हिडिओमध्ये म्हणाली. असेच काही आरोप रविना टंडन या अभिनेत्रीनेसुद्धा अक्षय कुमारवर केले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

You might also like